Home बीड आर्थिक,शैक्षणिक,राजकीय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ओबीसी आरक्षण मोर्चात सहभागी व्हा. -किरण वाघमारे

आर्थिक,शैक्षणिक,राजकीय प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी ओबीसी आरक्षण मोर्चात सहभागी व्हा. -किरण वाघमारे

115

✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)

बीड(दि.२२डिसेंबर):-ओबीसी समाज आपल्या न्याय हक्क आणि अधिकारा बाबत जागृत नाही, हीच बाब प्रस्थापित राजकारण्यांनी हेरून ओबीसी समाजाची मते घेऊन सत्तेत गेली. परंतु आरक्षण दिले नसून केवळ फसवणूक केली.जर ओबीसी समाजाच्या आर्थिक शैक्षणिक राजकीय सामाजिक व सांस्कृतिक प्रश्नांची सोडवणूक करायची असेल तर वंचित बहुजन आघाडी ने २३ तारखेला विधानभवनावर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय एडवोकेट प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महा मोर्चाचा एल्गार पुकारला आहे.त्या मोर्चात ओबीसी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन वं.ब.आ.बीड तालुकाध्यक्ष किरण वाघमारे यांनी केले आहे.

येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित वंचित बहुजन आघाडी बीड तालुका कार्यकारणी च्या संवाद बैठकीत बोलत ते होते. याप्रसंगी वाघमारे म्हणाले की,ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे व सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला एम्पिरिकल डेटा देण्यास मुदतवाढ देऊन ओबीसींचे सद्यस्थितीतील आरक्षण अबाधित ठेवावे.
या संवाद बैठकीस वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख डॉ.गणेश खेमाडे,जिल्हा सहसचिव मेजर अनुरथ वीर,वंचित बहुजन आघाडी चे ज्येष्ठ नेते डॉ. केशव दास वैष्णव यांचेसह तालुका उपाध्यक्ष श्रीकांत वाघमारे गणेश वीर, देवा गव्हाणे विश्वास अंगरखे विश्वजीत डोंगरे आकाशी जावळे ऋषिकेश वाघमारे सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here