



महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे आणि प्रादेशिक विद्या प्राधिकरण, (राज्य विज्ञान शिक्षण संस्था), नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अधिकारी, शिक्षक विद्यार्थी व पालक यांचेकरिता उपयुक्त कार्यक्रम *विज्ञानाचा गुरूवार* हा कार्यक्रम मा. एम. डी. सिंह (भा. प्र. से) संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे याच्या प्रेरणेतुन प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान शिक्षण संस्था), नागपूर येथील मा. रविंद्र रमतकर (संचालक) यांनी दर गुरुवारी *विज्ञानाचा गुरूवार* हा कार्यक्रम आयोजित केला असून यांचा फायदा विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरीत करणारा आहे.
*विज्ञानाचा गुरूवार*
सध्या जग हे कोवीड 19 च्या महामारीतुन नूकतेच सावरत आहे, या भिषण महामारीमध्ये मानवावर परिणाम झाला आहे, अशातच शाळा, काँलेज, महाविद्यालय, कारखाने, छोटे मोठे उद्योग बंद होते, अशातच शाळा बंद. मग विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात सातत्य राखुन ठेवण्यासाठी मा.रविंद्र रमतकर (संचालक)प्रादेशिक विद्या प्राधिकरण (राज्य विज्ञान शिक्षण संस्था) नागपूर यांनी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षकांना व विद्यार्थी यांना विज्ञानाचा गुरूवार हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून त्यात महाराष्ट्र राज्याची शिक्षक, पालक, विद्यार्थी, व विज्ञानात आवड असलेले पालक दर गुरुवारी न चुकता हा कार्यक्रम आँनलाईन बघत असतात. नुसते कार्यक्रम न बघता विद्यार्थी कार्यक्रम झाला की, झालेल्या विषयावर चर्चा करतात व यामधून विद्यार्थ्यांना नव नवीन माहिती मिळाली सोबतच विद्यार्थी नव नवीन तंत्रज्ञान वापरून प्रयोग करण्यासाठी तयार झाला, हे बघून पालक, शिक्षक यांना विज्ञानाचा गुरूवार हा कार्यक्रम उपयोगी आहे.
जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक मराठी शाळा मुडाणा या शाळेतील शिक्षक गजानन गोपेवाड व विद्यार्थी दर गुरुवारी विज्ञानाचा गुरूवार हा कार्यक्रम बघतात. यामधून विद्यार्थ्यांना नव नवीन माहिती मिळते, सोबतच शिक्षकांना पण भारतातील शास्त्रज्ञ व प्राध्यापक यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावून विद्यार्थी व शिक्षकांना प्रेरीत करणारे मार्गदर्शन करतात. यात राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर टिम ने यांनी विशेष कमालीचे प्रयत्न केले आहे. विशेष म्हणजे आदरणीय प्रतीभा गोहणे मँडम संचलन करतात.


