



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.22डिसेंबर):-स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधून आमदार खासदारकीसाठी स्पर्धक तयार होऊ नयेत यासाठी त्यांना ओबीसीचे आरक्षण घालवायचय असं मत ओबीसी नेते, परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी बुधवारी गोदावरीवरील अहिल्यादेवी होळकर घाटावर जलसमाधी आंदोलन वेळी बोलताना केल.
बुधवारी गोदावरीवरील अहिल्यादेवी होळकर घाटावर जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. पुढे बोलताना सखाराम बोबडे पडेगावकर म्हणाले की स्थानिक स्वराज्य संस्थांमधून नेतृत्व तयार होत असतं. या संस्थांमधून तयार झालेल्या नेतृत्व भविष्यात विधानसभा आणि लोकसभेत आम्हाला स्पर्धक तयार होईल या भीतीने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी चे आरक्षण संपुष्टात आणण्याचा डाव न्यायालयामार्फत सत्ताधारी मंडळी करीत आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी सर्व ओबीसीनी आरक्षण वाचवण्यासाठी सुरू असलेल्या वेगवेगळ्या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी केलं.
ओबीसी परिषदेचे गोविंद लटपटे ,गोविंद यादव, सखाराम बोबडे पडेगावकर ,एड आदिनाथ मुंडे ,बालाजी मुंडे, सदाशिव कुंडगीर, मधुसूदन लटपटे आदींनी जलसमाधी आंदोलनात प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंढे ,शिवसेनेचे विष्णू मुरकुटे, तुकाराम तांदळे, दीपक मुरकुटे, राम भोळे, मनोज मुरकुटे, मनोहर महाराज केंद्रे, पवन सोन्नर आदींनी जलसमाधी आंदोलनस्थळी उपस्थित राहून कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. यावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.


