



✒️संदिप सोनवणे(विशेष प्रतिनिधी,येवला)मो:-९६०४१६२७४०
येवला(दि.22डिसेंबर):- येवला तालुक्यातील निमगाव मढ व साताळी ग्रामपंचायत मधे कर्मचारी म्हणून कार्यरत असलेले ग्रामसेवक महेश महाले यांनी निमगाव मढ येथे चालू असलेल्या जन सुविधा अन्तर्गत स्मशान भूमी च्या कामाचे बिल काढण्या साठी ठेकेदार यांच्या कडे ८० हजार रुपये ची लाच मागितली होती परंतु ठेकेदार यांनी दिले नाही ग्रामसेवक यांनी बिल काढले नाही नंतर तडजोडी तून २० हजार रुपये ची मागणी केली आरोपी महेश महाले यांनी भ्रष्ट व पैसाच्या लोभात लाभ मिळवन्याची सुविधा करून गुन्हेगारी स्वरूपाचे वर्तन केल्याने लाच लुचपत प्रतिबंधक नाशिक विभाग यांनी साताळी ग्रामपंचायत कार्यालयात आरोपी महेश महाले यांना अटक करण्यात आली आले.
या कार्यवाही साठी पोलिस अधीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र अधिक्षाक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस निरीक्षक ए.एन.नेहारे , सतिष भांबारे, यांच्या मार्गदर्शनाखाली अभिशेक पाटील, पोलिस अधीक्षक मिरा आदमाने, पोलिस निरीक्षक यांच्या सह पोलिस हवालदार सुकदेव मुरकुटे, विनोद पवार, संतोष गांगुर्डे, प्रवीण महाजन आदिनी हि कार्यवाही केली.


