



🔸सर्व मागण्या लवकरच पूर्ण करू- आमदार ससाणे
🔹रिपब्लिकन युवा सेना आणि भीम टायगर सेनेचा जाहीर पाठिंबा
✒️सिद्धार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.21डिसेंबर):-अनेक वर्षापासून प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधीकडे अनेक वर्षापासून वारंवार विनंती, अर्ज, प्रत्यक्ष भेटी घेऊन सुद्धा मागण्या पूर्ण झाल्या नाही.म्हणून दिनांक 20 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता पासून उपविभागीय अधिकारी साहेब उमरखेड यांच्या प्रांगणात बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले होते.
◆खालील मागण्या-
1) मौजे टाकळी येथील उमरखेड ते राजापूर वाडी, टाकळी रस्ता 8 कि.मी खडकीकरण, डांबरीकरण करणे,
2) टाकळी व राजापूर वाडी येथे वाढीव वस्तीत इलेट्रिकल पोल नवीन बसवून जुना विधुत पुरवठा सुरळीत करणे,
3) टाकळी येथिल अवैध दारू विक्री बंद करणे,
4) टाकळी जुनी व राजापूर वाडी येथे स्मशानभूमी करिता शासकीय जागा उपलब्ध करून दहन शेड बांधून देणे इत्यादी मागण्यासाठी बेमुदत उपोषण सुरू होते.
संबंधित ग्रामस्थांनी रिपब्लिकन युवा सेनेच्या आणि भिम टायगर सेना यांच्या पदाधिकाऱ्यानी प्रत्यक्ष भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला होती.
तसेच अनेक सामाजिक कार्यकर्ते व राजकीय पुढाऱ्यांनी तसेच पत्रकार बांधवांनी भेटी दिल्यामुळे हे उपोषण लक्षवेधी ठरले.त्यामुळे 21 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता उमरखेड महागाव विधानसभेचे आमदार मा. नामदेव ससाने साहेब यांनी या लक्षवेधी बेमुदत उपोषणाची दखल घेऊन उपोषणकर्त्यांना भेट दिली. आणि सर्व मागण्यांवर चर्चा करून सर्व मागण्या लवकरच पूर्ण करू असे आश्वासन दिले.टाकळी येथील ग्रामस्थ- उपोषणकर्ते यांना मा.आमदार ससाणे साहेबांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर ह्या बेमुदत उपोषणाची सांगता करण्यात आली.


