



✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.21डिसेंबर):-भाजप सरकार भिती निर्माण करण्याचे काम करत असून महाराष्ट्रात अनेक फर्जी वाडे आहेत. आष्टीत ही फर्जी वाडा आहे. विठोबा देवस्थान, मस्जिद, राम देवस्थानच्या जमिनी बळकावल्या आहेत. मतदानात ही फर्जी वाडा केला आहे. हा फर्जी वाडा उघड करून जमिनी बळकावणा-यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिला.
आष्टी शहरातील नागरीकांनी दहशतीखाली न राहता दहशत मुक्त करण्यासाठी आमची फौज तैनात आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा, विकास करण्यासाठी आमचे सरकार आहे. निधी कमी पडू देणार नाहीत, असे मत नवाब मलिक यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहिर सभेत बोलताना केले.नमस्ते ट्रमच्या नादात कोरोना काळात अनेक मृत्युमुखी पडले त्यांची जबाबदारी मोदी सरकारची आहे.
महाराष्ट्रत एक ही रुग्ण औषधे वाचून मृत्युमुखी पडले नाही, भाजप सरकार करु शकले नाही ते एक महिन्यात महाविकास आघाडी सरकारने केले.शेतक-यांचे 2 लाख पर्यंत कर्ज माफ केले. सरकारने शेतक-यांनी संकटात हात दिला, भिती निर्माण करायचे राजकारण भाजप सरकार करतय फर्जी वाडा आष्टीत आहे. उघड करुन सर्वांना तुरंगात टाकणार, मस्जिद, विठोबा देवस्थान, राम देवस्थानच्या जमिनी सोडल्या नाहीत. दौडमध्ये ही जमीन सोडली नाही.


