Home महाराष्ट्र ओबीसी एल्गार परिषद लोकप्रतिनिधींच्या भेटीला !

ओबीसी एल्गार परिषद लोकप्रतिनिधींच्या भेटीला !

354

🔹ईंपॅरीकल डाटा साठी पाठपुरावा करण्याची केली मागणी 

✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)

गंगाखेड(दि.21डिसेंबर):- येथे सुरू असलेल्या ओबीसी एल्गार आंदोलकांनी आज जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधींच्या भेटी घेतल्या. ईंपॅरीकल डाटा तात्काळ तयार करण्यासाठी राज्य सरकारकडे आग्रही पाठपुरावा करण्याची मागणी सर्व लोकप्रतिनिधींकडे करण्यात आली.

गंगाखेड येथील अखंड धरने आंदोलनाचा आज नववा दिवस. विविध नेते, विचारवंत आंदोलन स्थळी भेटी देत आपला पाठिंबा दर्शवीत असतानाच आंदोलन कृती समितीने आपला मोर्चा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे वळवला. या लोकप्रतिनिधी मार्फत राज्य आणि केंद्र सरकारवर दबाव वाढवण्याची रणनीती आखण्यात आली. कृती समितीने आज परभणीत माजी मंत्री तथा आमदार सुरेश वरपुडकर, खा. संजय जाधव, आ. राहुल पाटील आदिंची प्रत्यक्ष भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. तर राज्यसभा सदस्या डॉ. फौजीया खान, जिंतूरच्या आमदार आ. सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, विधानपरिषद सदस्य बाबाजानी दुर्रानी यांचेशी दुरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला.

सर्वच लोकप्रतिनिधींनी ओबीसींचा ईंपॅरीकल डाटा लवकरात लवकर सादर करण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची हमी दिली. मुंबईत होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी हा मुद्दा ऊपस्थित करून यासाठीच्या निधी मंजुरीसाठी आग्रह धरणार असल्याचे आ. वरपुडकर यांनी सांगीतले. तर खा. जाधव यांनी या संदर्भाने राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही खा. संजय जाधव यांनी दिली.

या शिष्टमंडळात जि. प. सदस्य राजेश फड्, माजी नगराध्यक्ष रामप्रभू मुंडे, मनसेचे बालाजी मुंडे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव, पं. सभापती मुंजाराम मुंडे, माजी सभापती मगर पोले, माजी ऊपसभापती माधव शेंडगे, माजी सरपंच स्वप्नील मुंडे, बाळासाहेब राखे, प्रमोद साळवे आदिंचा सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here