Home महाराष्ट्र म्हसवड येथे उपासिका(महिला) शिबिरामध्ये ‘धम्मयान’ दिनदर्शिकेचा प्रकाशन

म्हसवड येथे उपासिका(महिला) शिबिरामध्ये ‘धम्मयान’ दिनदर्शिकेचा प्रकाशन

230

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.21डिसेंबर):-ता.माण येथे सुरू असलेल्या उपासिका(महिला) शिबिरा मध्ये भारतीय बौद्ध महासभेच्या ‘धम्मयान’ दिनदर्शिकेचे प्रकाशन केंद्रीय शिक्षिका विजया तेजाळे यांच्या हस्ते करणेत आले यावेळी माण तालुका शाखेचे संरक्षण उपाध्यक्ष ,बौद्धाचार्य पिंटू बनसोडे,बौद्धाचार्य आबासाहेब बनसोडे,संघटक सचिन सरतापे याची उपस्थिती होती.

यावेळी केंद्रीय शिक्षिका तेजाळे मॅडम यांनी दिनदर्शिकेविषयी बोलताना म्हणाल्या प्रत्येक धम्म बांधवांच्या घरी धम्मयान दिनदर्शिका असणे गरजेचे आहे या दिनदर्शिकेचे स्वरूप विशद केले की धम्माचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकासाठी धम्मयान आहे.बौध्दानी घरात कोणते सण उत्सव साजरे करावे याची अचुक माहीती देणारे एकमेव धम्मयान दिनदर्शिका आहे बौध्द धम्मातील महत्वाच्या घटणेचा आढावा घेणारी धम्मयान दिनदर्शिका आहे.चारी बाजूंनी रंगीत व सर्वाधिक खपाचे धम्मयान दिनदर्शिका आहे.बौद्धांच्या घराला घरपण देणारे धम्मयान दिनदर्शिका आहे.डॉ:बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक दिवसाचे महत्व सांगणारे धम्मयान दिनदर्शिका आहे.

सुबक-सचित्र व आकर्षक बुद्धाब्ध उपलब्ध असणारे धम्मयान दिनदर्शिका आहे असे सर्वरूपी परिपूर्ण असलेली ही धम्मयान दिनदर्शिका आहे.तालुका संरक्षण उपाध्यक्ष पिंटू बनसोडे बोलताना म्हणाले.भारतीय बौद्ध महासभा निर्मित आपला धम्ममित्र बौध्द धम्माचा संदेश वाहक धम्मयान दिनदर्शिका घ्या स्वतःच्या घरासाठी किंवा धम्मबंधूंना नवीन वर्षाची भेट देण्यासाठी धम्मयान दिनदर्शिका घ्या त्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार होईल.शिबिरार्थी सर्व महिलांनी ही धम्मयान दिनदर्शिका घेतली आणि सर्वाना घेण्याचा आग्रह करणार असल्याचे बोलल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here