



✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.21डिसेंबर):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पुसद यांच्या वतीने महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या महिलांचा मेळावा जुनी पंचायत समिती कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता.
पुसद तालुक्यातील ८४ ग्रामसंघांनी सहभाग नोंदवला आझादी का अमृत महोत्सव वर्ष निमित्त उमेद अभियानाच्या माध्यमातून समाजातील वंचित घटकांना शाश्वत उपजीविका उपलब्ध करुन देऊन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नियमित प्रयत्न सुरू असतात त्या दृष्टीने विविध प्रकारचे कार्यक्रम या दरम्यान आयोजित करण्यात आले होते.
यामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती,व व्यवसाय पर मार्गदर्शन तालुका अभियान व्यवस्थापक गौरवकुमार कांबळे यांनी केले.
या कार्यक्रमास ग्रामसंघाचे पदाधिकारी स्वयं सहाय्यता समुहाच्या सदस्या,समुह संसाधन व्यक्ति, कृषी सखी ताई,पशु सखी, बॅंक सखी ताई,CTC,FLCRP व कर्मचारी राहुल देशमुख, अर्षद अहेमद,मिलिंद ससाने,प्रकाश सिडाम, कृषी समन्वयक देविदास देशमुख,शुभम कठाने व उपजीविका समन्वयक दिगंबर राठोड व शामसुंदर यांची उपस्थिती होती.


