Home महाराष्ट्र धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पंचामृत अभिषेक व शुद्धीकरण

धरणगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पंचामृत अभिषेक व शुद्धीकरण

275

🔸पोलीस निरीक्षक व नायब तहसिलदार यांना निषेध चे निवेदन…

✒️पी.डी.पाटील सर(विशेष प्रतिनिधी)

धरणगाव(दि.21डिसेंबर):-येथे कर्नाटक राज्यातील बंगळूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाची विटंबना चा निषेधार्थ धरणगाव शहरातील समाज बांधव व महाविकास आघाडी तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला तत्पुर्वी पुराणिक पंडित महाराज गारखेडेकर यांनी मंत्रोच्चार करून छत्रपती शिवाजी महाराज यांचे शुद्धीकरण केले यावेळी शिवसेना सहसपर्क गुलाबराव वाघ व माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ याचा हस्ते अभिषेक केला यावेळी उपस्थित मान्यवरांनि घटनेचा निषेध व्यक्त करत कर्नाटक राज्यतील मुख्यमंत्री यांच्या राजीनामा घ्यावा तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांना दिवचण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा परिणाम भोगण्याची तयारी ठेवण्याचा आव्हान यावेळी गुलाबराव वाघ यांनी दिला यावेळी कॉग्रेस चे प्रदेश सचिव डी जी पाटील व राष्ट्रवादी चे जिल्हा उपाध्यक्ष दीपक वाघमारे शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन नाना पाटील यांनी घटनेचा निषेध व्यक्त यावेळी पोलिस निरीक्षक व नायब तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी उपस्थित यावेळी शिवसेनेचे गुलाबराव वाघ, काँग्रेसचे डी.जी. पाटील राष्ट्रवादीचे दिपक वाघमारे, नगराध्यक्ष निलेश चौधरी, यांच्यासह माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, पुष्पाताई महाजन, अंजलीताई विसावे, माजी नगराध्यक्ष पी.एम. पाटील, चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे गटनेते विनय भावे,नगरसेवक राजू महाजन,वासुदेव चौधरी,नंदू पाटील, सुरेश महाजन, विलास महाजन, अहेमद पठाण, किरण मराठे, जितेंद्र धनगर, शिवसैनिक रविंद्र जाधव, नगराज पाटील, प्रकाश पाटील, तौसिफ पटेल, कमलेश बोरसे, गुड्डू पटेल, वाल्मिक पाटील, बंटी पवार, भगवान पाटील, भगवान मराठे, कमलाकर पाटील, पापा वाघरे, भैय्या महाजन, राहुल रोकडे, विलास महाजन , छोटु जाधव, नदीम काजी, योगेश पी.पाटील, संजय पाटील, गोपाल चौधरी, समाधान पाटील, मोनू महाजन, अतुल पाटील, रुपेश चौधरी, यश भावसार, यांच्यासह असंख्य शिवप्रेमी उपस्थित होत…कार्यक्रम चे प्रस्ताविक व सूत्रसंचालन शिवसेनेचे उलजिल्हा प्रमुख पी.एम. पाटील सर तर आभार विनोद रोकडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here