




जगात अनेक हुकूमशहा होऊन गेले ते त्यांच्या क्रूरपणाबद्दल जितके प्रसिद्ध होते तितकेच ते त्यांच्या विक्षिप्तपणाबद्दल देखील प्रसिद्ध होते. असाच एक विक्षिप्त हुकूमशहा आपल्या विक्षिप्तपणाबद्दल जगभर ( कु )प्रसिद्ध आहे तो म्हणजे उत्तर कोरियाचा किम जोंग उन. आपल्या विक्षिप्तपणा बद्दल जगभर ओळखला जाणारा उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दक्षिण कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन आपल्या देशात नेहमीच अजब आदेश काढत असतो. त्याचे आदेश कल्पने पलीकडील असतात. त्याच्या या अजब आदेशांचे पालन करणे जनतेला बंधनकारक असते जो त्याचे आदेश मोडेल त्याला कठोर शिक्षा केली जाते. आताही त्याने देशवासियांसाठी असाच अजब आदेश काढला आहे. किम जोंग उन याने देशवासियांच्या हसण्यावरच बंदी घातली आहे.
या आदेशानुसार जर कोणी आनंद व्यक्त करण्यासाठी दारू पिताना आढळला तर त्याला थेट मृत्युदंड मिळणार आहे. हा आदेश काढण्यामागचे कारण म्हणजे हुकूमशहा कीम जोंग उन याच्या वडिलांची १७ डिसेंबरला दहावी पुण्यतिथी आहे. किम जोंग उन याचे वडील किम जोंग ईल हे १९९४ ते २०११ या कालावधीत उत्तर कोरियाचे हुकूमशहा होते. १७ डिसेंबर २०११ ला किम जोंग उन च्या वडिलांचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. यावर्षी त्याला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत त्यामुळे संपूर्ण देशात अकरा दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या अकरा दिवसात दक्षिण कोरियातील नागरिकांनी केवळ शोक व्यक्त करायचा असून या कालावधीत जर एखादा नागरिक आनंद व्यक्त करताना आढळला इतकेच काय तर हसताना जरी आढळला तरी त्याला कठोर शिक्षा दिली जाणार आहे. या कालावधीत कोणालाही वाढदिवस साजरा करता येणार. या कालावधीत लग्न समारंभावरही बंदी घातली असून देशातील नागरिकांनी फक्त दुःखच व्यक्त करायचे असून कोणालाही नवीन वस्तू , नवीन कपडे खरेदी करता येणार नाही.
या अकरा दिवसात नागरिकांना घरी चांगली डिश बनवता येणार नसून सर्वानी साधेच जेवण करायचे आहे. या अकरा दिवसाच्या दुखवट्या दरम्यान जर कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना मोठ्याने रडण्याची परवानगी नाही. तसेच मृतदेह देखील हा दुखवटा संपल्यानंतरच बाहेर नेता येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन करताना कोणी आढळला तर त्याला तात्काळ अटक केली जाणार आहे. लोक या दुखवट्यात दुःख व्यक्त करतात की नाही हे पाहण्याच्या सूचना पोलिसांना देण्यात आल्या असून दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. किम जोंग ऊन याने याआधीच दक्षिण कोरियातील नागरिकांवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्याच्या या निर्बंधानी तेथिल जनता हैराण झाली आहे त्यात हे नवे निर्बंध लागू झाल्याने उत्तर कोरियातील नागरिक पुरते हैराण होणार आहेत पण या हुकूमशहाच्या विरोधात कोणीही ब्र शब्द काढू शकत नाही. आपण भाग्यवान आहोत की आपल्या देशात लोकशाही आहे. आपल्या देशातील जे लोक उठसुठ लोकशाहीवर टीका करतात आणि हुकूमशाहीचे समर्थन करतात त्यांनी दक्षिण कोरियातील जनतेचे हे नष्टचक्र पहावे म्हणजे त्यांना लोकशाहीचे महत्व समजेल.
✒️श्याम ठाणेदार(दौंड जिल्हा,पुणे)




