Home महाराष्ट्र सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे उमरखेड शहरात दगडफेक व जाळपोळ

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे उमरखेड शहरात दगडफेक व जाळपोळ

117

🔸माजीमंत्री संजय राठोड यांची नुकसानग्रस्तांना भेट 

✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466

उमरखेड(दि.19डिसेंबर):-शहरात 17 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर एका धर्मा बद्दल अपप्रचार असणारा व्हिडिओ अपलोड केल्याने संतापाची लाट उसळली त्यानंतर शेकडो संतप्त नागरिकांनी पोलीस स्टेशनला धडक दिली नागरिक पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केल्यानंतर घरी परतत असताना संतप्त जमावाने शहरातील अनेक गाड्यांची तोडफोड केली तर नाग चौक स्थित एका ऑटोमोबाइल्स ला आग लावण्यात आली शिवाय एक हेअर सलून फोडण्यात आल्याची घटना घडली असून शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

जील्हा पोलिस अधीक्षक दिलीप भुजबळ यांनी दिलेल्या माहितीवरून सविस्तर वृत्त असे की 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 8.30 च्या दरम्यान तीन युवकांनी इंस्टाग्राम ॲप वर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष दर्शी अर्थात लाईव्ह येऊन एका समाजा बद्दल आक्षेपार्ह विधान करत व्हिडिओ प्रसिद्ध केला.

काही क्षणातच सदर व्हिडिओ व्हायरल झाल्याने संबंधित समाजाच्या भावना अनावर झाल्या यावर त्या समाजाच्या युवकांनी पोलीस स्टेशन गाठले परंतु पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केल्यानंतर ही बराच वेळ आरोपींवर गुन्हा दाखल करून आरोपी शोधण्यामध्ये लागत असल्यामुळे सायंकाळच्या दरम्यान जमाव पोलीस स्टेशन समोर जमा झाल्यावर पोलीस स्टेशन मधून परतत असताना रस्त्यातील अनेक वाहनांची काचा फोडून नासधूस केली.

सोबतच नाग चौक स्थित भराडे यांचे गणेश ऑटोमोबाईल्स जाळण्यात आले तर नरवाडे यांचे प्रेरणा हेअर सलून याची तोडफोड करण्यात आली.यावर पोलिसांनी या घटनेची दखल घेत तीन विविध गुन्हे दाखल केले आहेत.

सर्वप्रथम व्हिडीओ मध्ये दिसणाऱ्या चार युवकांनी सोशल मीडियावर व्हिडिओ अपलोड करुन भावना भडकविल्या यांचेवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.तर दुकान जाळपोळ प्रकरणी आणि गाड्यांची तोडफोड प्रकरण अशा तीन विविध गुन्ह्यांवर विविध कलमान्वये अनेक आरोपींवर गुन्हे दाखल केले असून सद्यस्थितीत वृत्त लिहीपर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे.अशी माहिती दिली आहे.

सदर घटनेमध्ये चारचाकी वाहन, दोन तिनचाकी अॅटो तर दुचाकी वाहनांची तोडफोड झाली असल्याचे पोलीस दप्तरी नोंद करण्यात आली आहे.शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून तनावपूर्ण शांतता आहे.शहराला छावणीचे स्वरूप आले असले तरीही व्यापाऱ्यांनी सकाळपासूनच बाजारपेठा स्वयंस्फूर्तीने बंद केल्याने शहरात अद्यापही तणावाचे वातावरण आहे.

सदर घटनेनंतर आमदार नामदेव ससाने हे नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत रात्रभर फिरले असून सकाळपासून अफवांना बळी पडू नका..! अफवांवर विश्वास ठेवू नका..! नागरिकांनी शांतता पाळावी…!असे आवाहन करत आहे.सदर घटनेवर जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ, सहाय्यक पोलीस अधीक्षक धारणे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाडवी, पोलीस निरीक्षक अमोल माळवे, यांचे सह जिल्ह्यातील सर्व अधिकारी या घटनेवर लक्ष ठेवून आहेत.

◆महाविकासआघाडी ला बदनाम करण्याचे षड्यंत= आमदार संजय राठोड

काळी दौलत खान येथील घडलेल्या घटनेनंतर उमरखेड शहरांमध्ये मतांचे तुष्टीकरण करण्याकरता दोन समुदायांमध्ये भांडण लावून वातावरण बिघडविण्याचे कार्य करण्यात येत आहे महा विकास आघाडीच्या विकासात्मक वाटचालीला बदनाम करण्याचे षडयंत्र असून या घटनेमागील आणी या घटनेमध्ये समाविष्ट असणाऱ्या कुठल्याही दोषींची गय केल्या जाणार नाही शिवाय या घटनेमागील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन अटक करण्यात यावी असे पोलिसांना निर्देश देण्यात आले असल्याचे माजी पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी स्थानिक विश्रामगृह येथे पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here