Home महाराष्ट्र कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडुन सक्तीची विजबिल वसुली करणा-या भिकारप्रवृत्तीच्या वसुली सरकारच्या निषेधार्थ...

कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडुन सक्तीची विजबिल वसुली करणा-या भिकारप्रवृत्तीच्या वसुली सरकारच्या निषेधार्थ “भिक मांगो “आंदोलन ,जमा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार

246

🔸बेकायदेशीर विजकनेक्शन तोडल्याप्रकरणात महावितरण आधिकारी-कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करा:- डाॅ.गणेश ढवळे

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

बीड(दि.19डिसेंबर):- जिल्ह्य़ातील महावितरण आधिकारी-कर्मचा-यांकडुन कृषिपंपाची बेकायदेशीर रित्या विजकनेक्शन तोडुन कष्टाने पिकवलेल्या रब्बी हंगामातील बहरलेली पिके सुकून जात असून आर्थिक नुकसान होत आहे. तसेच आधिकारी-कर्मचा-यांकडुन अडाणी अशिक्षित शेतक-यांची अडवणुक व आर्थिक पिळवणुक होत आहे, याविषयी महावितरणने सक्तीची विजबिल वसुली तात्काळ बंद करण्यात येऊन सामंजस्यपूर्ण भुमिका घ्यावी यासाठी विविध सामाजिक कार्यकर्ते,सामाजिक तसेच राजकीय संघटना यांनी निवेदने, आंदोलनानंतर सुद्धा महावितरण शेतक-यांना वेठीस धरत असून सरकारच्या भिकार प्रवृत्तीच्या वसुली सरकारचा निषेधार्थ दि.१९ डिसेंबर रविवार रोजी नेकनुर आठवडे बाजारतळावर भाजीपाला तसेच जनावरांची विक्री करणा-या शेतक-यांकडुन भिक स्वरूपात जमा राशी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, सामाजिक कार्यकर्ते संदिप जाधव, डाॅ.संजय तांदळे, मोहम्मद मोईज्जोदीन, सय्यद आबेद, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे आदिंनी आंदोलनात सहभाग घेतला होता .

महावितरणने शेतक-याला वेठीस धरले आधिका-यांची मनमानी पशुधनाची मातीमोल दराने विक्री :-
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे
____
कृषिपंपाची बेकायदेशीर रित्या विजकनेक्शन तोडुन सक्तीची विजबिल वसुली करून वेठीस धरणे महावितरणचे हे पाऊल शेतक-यांमध्ये आक्रोश निर्माण करणारे आहे,जनावरांचे पाण्यावाचुन हाल होत असून मातीमोलदराने पशुधनाची बाजारात विक्री नाईलाजाने करावी लागत आहे.बेकायदेशीर विजकनेक्शन तोडल्याप्रकरणात महावितरण आधिकारी-कर्मचा-यांवर गुन्हे दाखल करा: डॉ. गणेश ढवळे

वास्तविकता विज कायदा २००३ मधिल तरतुदीनुसार वीज कनेक्शन तोडण्यापुर्वी वीज ग्राहकाला १५ दिवस अगोदर कायदेशीर नोटीस देणे बंधनकारक असुन मुंबई उच्च न्यायालयाने जनहीत याचिका ८६५१/१० मध्ये स्पष्ट आदेश दिलेले आहेत याकडे दुर्लक्ष करत महावितरण कंपनीचे अधिक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंता, लाईनमन मनमानी कारभार करत ग्रामीण भागातील शेतक-यांची अडवणुक व आर्थिक फसवणूक करत असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशी मागणी सपोनि नेकनुर पोलीस स्टेशन ठाणे अंमलदार नागरगोजे ए.एल.,बीट अंमलदार खांडेकर डी. यु. ढाकणे बी आर.यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here