Home महाराष्ट्र लिनाताई साळवे यांच्या नेतृत्वाखाली धानोरा शहरात विविध विकास कामे

लिनाताई साळवे यांच्या नेतृत्वाखाली धानोरा शहरात विविध विकास कामे

115

🔹२३४ घरकुल मंजुरीसह अभ्यास गृह आणि वाचनालयाचे बांधकाम..

✒️गडचिरोली,धानोरा(चक्रधर मेश्राम)

गडचिरोली(दि.19डिसेंबर):-संपूर्ण देशातून आदिवासी समजल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा नगर पंचायतला अल्पावधीत विविध प्रकारची विकास योजना राबविण्यात अग्रेसर असणारे शहर म्हणून ओळखले जाते. एवढेच नव्हे तर महामहीम राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते धानोरा नगर पंचायतीचा सन्मान करण्यात आला आहे. ही धानोरा नगर विकास कामाची पावती आहे. इतकेच नव्हे तर धानोरा वासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक दृष्टीकोनातून आणि त्यांच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी धानोरा येथील सौ. लिनाताई साईनाथ साळवे यांनी यशस्वीरीत्या प्रयत्न केले.

इतकेच नव्हे तर लिनाताई साळवे यांनी शहरात विविध प्रकारची विकास योजना, कामे करण्यासाठी अहोरात्र चौफेर प्रयत्न केले आहे. धानोरा येथील आठवडी बाजारात वर्षानुवर्षे चिखलाचे साम्राज्य असतांना त्या ठिकाणी एक कोठी 24 लाख रुपयांचे 90 ओटे आणि सिमेंट रस्त्यांचे कामे करून विविध लघु उद्योग, व्यवसाय करणाऱ्या तसेच सर्वसामान्य व व्यापाऱ्यांना महत्त्वाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या. महत्त्वाची भूमिका म्हणजे सौ. लिनाताई साईनाथ साळवे यांनी अभ्यासासाठी अभ्यासगृहासह, सुसज्ज वाचनालयाची व्यवस्था केली आहे.

धानोरा शहरात 234 घरकुल बांधकाम पूर्ण करण्यासाठी मंजुरी देऊन त्यातील बहुतांश कामे पूर्ण झाले आहेत. . शहरातील नागरिकांना अत्यावश्यक असलेल्या पाणी पुरवठ्याची वेळोवेळी योग्य सोय उपलब्ध व्हावी यासाठी ६ ठिकाणी सोलरपंप बसविण्यात आले. सौ लिनाताई साईनाथ साळवे यांनी 45 नवीन हाॅयमाॅस्क लाऊन सुधारणा करण्यासाठी यथायोग्य प्रयत्न करून धानोरा येथील विजय व्यवस्था सुरळीत चालू केली आहे. दुर्लक्षित समजल्या जाणाऱ्या धानोरा येथील नगर पंचायत मध्ये अग्निशमन वाहन उपलब्ध व्हावे यासाठी खूप प्रयत्न केले. जामा मस्जिद धानोरा येथे 40 लक्ष रुपये खर्च करून रस्ते वीजपुरवठा व शौचालय व्यवस्था करण्यात आली.

स्मशानघाटाचे विविध प्रकारच्या विकास कामासाठी 95 लक्ष रुपये खर्च करून विविध प्रकारचे कामे करण्यात आली. खासदार अशोक नेते आणि डॉ. देवराव होळी यांच्या मार्गदर्शनाखाली सौ लिनाताई साईनाथ साळवे यांनी अनेकविध प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र चौफेर प्रयत्न केले आहेत.धानोरा येथील नगर पंचायतींच्या, शहराच्या विविध प्रकारच्या विविध विकास योजना, सुशासन, राहाण्यासाठी सौ. लिनाताई साईनाथ साळवे यांनी यशस्वीरीत्या प्रयत्न केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here