



✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.19डिसेंबर):-जिल्हा परिषद उर्दू शाळा ईसापुर (धरण )येथे नव्याने शाळा व्यवस्थापन समिती स्थापन करण्यासाठी पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी प्रमुख म्हणून उपस्थित सरपंच बि.सी.थोरात ,सय्यद ईसाभाई शेख बाबु शेख उस्मान शेख हाशम भाई शेख लियाखत भाई ,पोलीस पाटील विश्वदीप थोरात, शेख मुशीर शेख खाजा इप्तेखार भाई मौलांना साब शे.ताहेर शे.रज्जाक, ज्योतिबा थोरात ,इस्राइल पैलवान अमजतभाई नईम भाई जब्बार भाई गुरुजन वर्ग व पालक या सर्वांच्या उपस्थितीमध्ये गुप्त मतदान द्वारे अध्यक्ष उपाध्यक्ष यांची निवड घेण्यात आली.
शाळा व्यवस्थापन समितीचे *अध्यक्ष* म्हणून
*सय्यद मुस्ताक सय्यद ईसा* यांची निवड झाली व *उपाध्यक्ष* म्हणून *शेख हमीदूल्ला शेख हमीद* यांची निवड करण्यात आली.अध्यक्ष उपाध्यक्ष व सदस्य गण यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी मन:पूर्वक प्रयत्न करावे अशी पालक वर्ग कडुन अपेक्षा आहे.ज्योतिबा थोरात ग्रा.प.सदस्य ईसापुर यांनी शाळा व्यवस्थापन समितीला पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या.


