



🔸राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2020-2021 अंतर्गत..
✒️रोशन मदनकर(उप संपादक)
ब्रम्हपुरी(दि.19डिसेंबर):-राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान सन 2020-2021 अंतर्गत कोलारी येथे कृषी विभागा मार्फत जनार्धन तलमले यांच्या शेतीवर शेतकऱ्यांसाठी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.कृषी विभागातर्फे गावात शेतकऱ्यांना पिक प्रात्यक्षिकासाठी मोफत हरभरा पिकाचे बियाणे वाटप करण्यात आले होते.शेतकऱ्यांना उत्पादन घेत असतांना निसर्गाच्या वेळोवेळी होत असलेल्या बदलांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत असतो.
त्यामुळे शेतीशाळेचे आयोजन करुन शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकारण करण्यात आले.सदर शेतीशाळेत कृषी सहाय्यक पी.बी.बंगाळे यांनी शेतकऱ्यांना हरभरा पिकातील एकात्मीक कीड व्यवस्थापन या बाबत मागदर्नात निबोंळी अर्क,रासायनिक किटकनाशक तसेच पक्षीथांबा यांच्या वापराबाबद सखोल मार्गदर्शन करुन प्रत्यक्ष शेतावर कीडींचे व्यवस्थापन करुण दाखविले व नियंत्रणाबाबद उपाययोजना करण्याचे सांगितले.
सदर शेतीशाळेत उपसरपंच नुतन प्रधान,शेतीमित्र गजानन भुरले प्रगतशिल शेतकरी जनार्धन तलमले,मनोज हुमने,गणपत प्रधान,अरुण प्रधान,शरद राऊत,बुद्धीष्ट बोरकर,प्रकाश राऊत,रुपचंद भुरले,वामन तुपटे,भारत भुरले आदी सहीत बळीराजा शेतकरी बचत गटाचे सदस्य व अन्य शेतकरी उपस्थित होते.





