



✒️विशेष प्रतिनिधी(समाधान गायकवाड)
अंबाजोगाई(दि.19डिसेबंर):-अंबाजोगाई तालुक्याचे वैभव असलेले बुट्टेनाथ मुकुंदराज येथील जंगलात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे या वृक्षतोडीकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत असल्याकारणाने येथील शेकडो झाडांची कत्तल सर्रास दिवसाढवळ्या होत आहे अंबेजोगाई तालुक्यातील फॉरेस्ट विभाग झोपला आहे का ? असा प्रश्न जनतेला पडत आहे.
या जंगलामध्ये शेकडो च्या प्रमाणात विविध आयुर्वेदिक वनस्पती आढळतात त्याचे जतन करणे वनविभागाचे काम असतांना वनविभागाच्या वतीने सोयीने डोळेझाक सुरू आहे तसेच येथे शेकडो एक्कर जमीनीवर अवैध कब्जा होत आहे याची सुद्धा वनविभागाने नोंद घ्यावी अन्यथा लोकजनशक्ती पार्टी च्या वतीने फॉरेस्ट विभागाच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी अशी विनंती राजेश वाहुळे यांनी केली आहे





