



देशात ओबीसी लोकसंख्या हे नेहमीच लक्षवेधी असते.प्रत्येक पक्षात आणि मंदिरात सर्वात मोठा कार्यकर्ता आणि भक्त हा ओबीसी जातीतील असतो.ओबीसी जातीच्या सहा हजार सहाशे जातीची भक्तीचा गांभीर्याने विचार केला तर पायाखालची जमीन सरकल्या शिवाय राहणार नाही. देशातील सर्वच मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या नेत्यांना ओबीसी जनगणना करण्याची इच्छाशक्ती नाही.देशातील कोणत्याही हिंदुच्या मंदिरात ओबीसीना पुजारी,ट्रस्टी म्हणून स्थान नाही.तरी त्यांच्यात भक्तीची आणि कार्यकर्त्यांची कमी नाही.ओबीसीना किती ही असमानतेची वागणूक दिली, तरी त्याच्यातील स्वाभिमान जागा होतांना दिसत नाही.जाऊद्या आपल्याला काय घेणेदेणे,तर चला आपण ओबीसीची भक्तांची करोडपती मंदिरे त्यांची माहिती घेऊया.
भारतात हिंदूंची मंदिरे- पाच लाख शहात्तर (76) हजार आहेत,मंदिरातील पुजा-यांची संख्या- तीस लाखाच्यावर आहे. मंदिरांतील सोने -बारा हजार आठशे मेट्रीक टन (एक मेट्रीक टन = 1000 किलोमध्ये 12800×1000 = 1 कोटी अट्ठावीस लाख किलो.) आजच्या बाजारभावा नुसार मूल्य काढा. मंदिरांना मिळणारी किमान वार्षिक दक्षिणा बारा लाख,एक हजार कोटी रूपये.मंदिराचे सारे विश्वस्त कोण?. तर ब्राह्मण.मंदिरांतील सगळे पुजारी, पुरोहीत ब्राह्मण.मंदिरांतील सगळी संपत्ती कुणाकडे?. तर ब्राह्मणांकडे.ती संपत्ती त्यांच्याकडेच राहावी म्हणून मंदिर व्यवस्थापन कायद्याला विरोध कुणाचा?. याच ब्राम्हणांचा.कमी शिकलेले ब्राह्मण पुजारी, पुरोहीतगिरी करतात.बाकी उच्च शिक्षण घेऊन उच्चपदावरच्या नोक-या करतात. मंदिरांतून ९४ टक्के ब्राम्हणेतर म्हणजे मुलनिवासी बहुजन,ओबीसी समाजाकडून (म्हणजे ज्यांना ते शूद्र – अतिशूद्र म्हणजे संस्कृतमध्ये याचा साधा सरळ अर्थ म्हणजे गुलाम म्हणतात) ज्यांना याच ब्राम्हणांनी ६७४३ इतक्या प्रचंड जातींमध्ये विभागले. ह्या ९४ टक्के लोकांकडून मिळणारा अफाट धनलाभ लक्षात घेऊन बरेचसे ब्राह्मण नोकरी – व्यवसाय सांभाळून पार्टटाईम जाॅब म्हणून पुरोहीतगिरी जन्मसिद्ध हक्काने करतात.अशा प्रकारे मंदिरे ही भटा-ब्राह्मणांची रोजगार हमी योजना आहेत.
आणि ती विना अडथला वर्षानुवर्षे चालूही आहेत.आणि हा सगळा पैसा ९४ टक्के लोकं (जे संख्येने बहू म्हणजे जास्त आहेत. म्हणून यांना बहुजन समाज म्हटले जाते.) हा बहुजन समाज देवाची कृपा व्हावी म्हणून श्रद्धेने जमा करतात परंतु त्याचा हिशोब मात्र मागत नाहीत.कोणी प्रबोधनाचा प्रयत्न केलाच, तर त्याला धर्मभंजक, नरराक्षस, नास्तिक ठरवले जाते. हे ठरवण्यात सगळ्यात आघाडीवर असतो तो हाच कपटी ब्राह्मण अन आपला देवभोळा, श्रद्धाळू,धर्मभोळा आणि वेडगळ बहुजन समाज अशा कपटी ब्राह्मणांच्या सोबतीला राहून तो सुध्दा विरोध करतो. चांगल्या गोष्टींना विरोध करणारा बहुजन समाज पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात मुतणाऱ्या बडव्यांविरोधात मात्र कमालीचा षंढ (नपुसंक) बनून थंड बसलेला होता.
ऊठसूट बहुजनांना हिंदुत्वाचा डोस पाजून माथी भडकवणा-या किती हिंदुत्ववादी पक्ष व संघटनांनी जिजामातेच्या चारित्र्यावर घाणेरडे शिंतोडे उडवणा-या जेम्स लेनच्या लिखाणा विरोधात निदर्शने,निवेदने,उपोषणे केली?.एकही नाही ! कारण जवळ-जवळ सर्वच हिंदुत्ववादी पक्ष,संघटनांचे प्रमुख हे ब्राह्मणच आहेत.हा विषय त्यांच्या फायद्याचा, हितरक्षणाचा नसल्याने अशा वेळेस ते कधीही “हिंदू खतरे में” अशी बांग देणार नाहीत. मात्र ज्या वेळेस त्यांनी अशी बांग दिली की आपण समजावे की हिंदू नाही तर “ब्राह्मण खतरे में” आहे.एवढ्या अफाट संख्येने ब्राह्मण लोक हे मंदिरांमध्ये पुजारी आहेत परंतु त्यामध्ये बहुजन पुजारी एकही नाहीत.का आजही हिंदु धर्मात बहुजनांना तो मान नाही?. का देवाला आम्हा माणसांसारख्या माणसांकडून (शूद्र – अतिशूद्र ९४% बहुजन हिंदूंकडून) पूजा-विधी मान्य नाहीत काय ?. आजपर्यंत “मंदिरांत पुजा-यांची भरती” अशी जाहीरात कधी वाचली आहे का?.
बहुजन समाजातील कथा-किर्तनकार,प्रवचनकार, बुवा ह्यांनी आयुष्यभर देवाच्या नावाने फक्त टाळच कुटायचे का?. त्यांना हा अधिकार केव्हा मिळणार?.हा अधिकार ठरविणारा असा कोणता देव आहे?.का ह्याच ब्राम्हणांचा धर्म,कर्माला नव्हे तर जन्माला महत्त्व देतो. मग हाच ब्राम्हण कितीही नालायक असला तरी शेवटी तोच श्रेष्ठ असतो.का आजही मोठ्या पदावर पोहचलेल्या बहुजनाला सुद्धा मुला-मुलींच्या लग्नात मात्र हजारो लोकांसमोर शेंबड्या भटाच्या पायावर डोके ठेवावे लागते?.का बहुजन आपल्या सर्व प्रकारच्या विधी बहुजनाकडून करून घेत नाहीत?.एखादा पुढाकार घेऊन जातीव्यवस्थेला मोडीत काढीत असेल तर त्याला धर्मभ्रष्ट का ठरवले जाते?. असे अनेक प्रश्न आहेत. याचा विचार सर्वच ९४ टक्के बहुजनांनी करावा.ब्राह्मण हा देवी-देवतांच्या,हिंदुत्वाच्या नावाने हजारो वर्षापासून बहुजनांचे शोषण करीत आहे आणि त्यांचा शोषणाचा निर्धोक मार्ग हा मंदिरांमधून जातो. म्हणूनच मंदिराच्या निर्मितीवर ब्राह्मणांचा भर हा अधिक असतो.त्यात बहुजन ओबीसी समाज सर्वात मोठ्यासंख्येने असतो.
भारत हा जगातील क्रमांक १ चा गडगंज संपत्ती असलेला देश आहे. तरी पण सगळी संपत्ती ह्या मुठभर तीन टक्के ब्राम्हणांनाच्या हक्काची आहे. त्याचे खंत बहुजन ओबीसीना कधीच वाटत नाही. मंदिराच्या संपतीमुळे आज देशात एकही गरीब नसायला पाहिजे. पण ३० करोड लोकांना आज एकवेळेचे पोटभर जेवण मिळणे मुश्किल आहे. त्यांचे या ब्राम्हणांना काही देणे घेणे नाही.सामाजिक बांधिलकी किंवा माणुसकी नावाचा अंश यांच्या रक्तात नाही. कारण हे ३५०० वर्षापूर्वी खैबरखिंडीतून आलेले आर्य आहेत. ज्यांनी आपल्याला ३५०० वर्षापासुन बहुजन ओबीसी समाजाला जाती-पातीच्या नावावर मानसिक गुलाम बनवून ठेवले. बहुजन ओबीसी पण हा देवभोळा बनून स्वर्गात जाण्यासाठी जिवंतपणी अनंत आत्ना भोगतो.बहुजनांना ओबीसीना शिक्षणात नोकरीत जे काही आरक्षण मिळाले ते कोणत्याही देवामुळे नवसामुळे नव्हे तर महामानव विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे.आज त्यांची चारीबाजूने कोंडी होत असतांना तो पाहिजे तेवढ्या तीव्रतेने पेटून उटला नाही. तेव्हा ९४ टक्के ब्राम्हणेतर मुळनिवासी बहुजन ओबीसी तीन टक्के ब्राम्हणांच्या थोतांडापासून सावध होत नाही.
आम्ही जीवावर उद्धार होऊन असे प्रबोधन करणारे लिहत असतो.सत्य असत्याची जाणीव करून देणे म्हणजेच प्रबोधन आहे असे तथागतांनी व महामानवानी आम्हाला सांगितले आहे.समाजाच्या हिताचे व कल्याणाचे विचार परखडपणे निर्भीडपणे निपक्षपातीपणे लिहणे,बोलणे मांडणे म्हणजेच प्रबोधन असते.बहुजन मुलनिवासी ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण बंद करण्याचा प्रयोग यशस्वी झाला तर भविष्यात वर्णव्यवस्था रामराज्य येण्याची ही पूर्व तयारी आहे हे सर्व बहुजनांनी ओबीसीनी समजून घेणे ही काळाची गरज आहे.आम्ही बुद्ध,शिव,फुले,शाहू आंबेडकरांच्या विचारांचे लोक सतत जनजागृती करण्यासाठी लिहत असतो.ओबीसी समाज लोकसंख्येच्या बळावर वाघ आहे.पण झोपलेला आहे.तो खरच वैचारिक पातळीवर जागृत झाला तर धर्मसत्तेसह शैक्षणिक,सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय सत्तेचे केंद्र उध्वस्त करू शकतात.म्हणूनच सुरवात कुठून करावी तर ब्राम्हणाची रोजगार हमी म्हणजेच करोडपती मंदिरे ओबीसी भक्तीमुळे ओसंडून वाहतात ती बंद झाली पाहिजेत.
✒️सागर रामभाऊ तायडे(भांडूप,मुंबई,अध्यक्ष सत्यशोधक कामगार संघटना(९९२०४०३८५९)


