



✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
बीड(दि.19डिसेंबर):- शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उंचीचे व परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिष्ट मंडळाने केली होती. याठिकाणी साचणारे पाणी व इतर समस्याबाबत आ.संदिप क्षीरसागर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसराची पाहणी केली.यावेळी शिष्ट मंडळाने समाज घटकातील सर्वांना तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती प्रेम करणार्या मंडळींना विश्वासात घेवून उंची वाढवण्याच्या व सुशोभीकरणाच्या कामाबाबत त्यांचे मत व सूचना घ्याव्यात. या कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही आ.संदिप क्षीरसागर यांनी दिली आहे.
शनिवार दि.१८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता आ.संदिप क्षीरसागर यांनी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते ऍड.डी.बी.बागल, वैजीनाथ तांदळे, बबन गवते, सम्राट चव्हाण, अशोक वाघमारे यांच्यासह शिष्ट मंडळासमवेत घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बीड शहरातील पुतळ्याची पाहणी केली.याठिकाणी रस्त्याचे काम होत असतांना साचणारे पाणी व इतर अडीअडचणी बाबत शिष्टमंडळांनी सूचना करत परिसराचे सुशोभीकरण व भीमसृष्टी दुरूस्ती संदर्भात काही मागण्या अशोक वाघमारे यांच्या समवेत शिष्ट मंडळाने केल्या होत्या. या मागण्यांची आ.संदिप क्षीरसागर यांनी तात्काळ दखल घेत प्रशासनाला तशा सूचनाही दिल्या आहेत.


