Home महाराष्ट्र भीमा कोरेगाव दिनाआधी दीपक केदार यांना जामीन मिळणे गरजेचे – पँथर डॉ....

भीमा कोरेगाव दिनाआधी दीपक केदार यांना जामीन मिळणे गरजेचे – पँथर डॉ. माकणीकर

265

✒️मुंबई(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

मुंबई(दि.19डिसेंबर):-भीमा कोरेगाव शॉर्यदिनी अभिवादन कार्यक्रमास उपस्थित राहण्यास पँथर नेते दीपक केदार यांना अनुमती मिळावी मात्र तत्पूर्वी त्यांना मा. न्यायालयाने जामिनावर सुटका करावी असा मनोदय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक चे राष्ट्रीय महासचिव पँथर डॉ राजन माकणीकर यांनी व्यक्त केला आहे.*

विद्रोही पत्रकार डॉ राजन माकणीकर पुढे म्हणाले की, दीपक केदार हे मनुवादयांचा कर्दनकाळ ठरणारे वादळ असून तुफाणाला कोणत्याही कोठडीत डांबून ठेवता येत नाही, मात्र: कायद्याच्या कचाट्यात अडकवून चळवळीतील उमलता व युवा नेता संपवण्याचा मनुवादी सरकारचा डाव असेल तर आंबेडकरी जनता मुळीच खपवून घेणार नाही.

असे प्रकार व प्रकरणे करून जे आंबेडकरी युवा नेतृत्वास संपवण्याचा किंवा अडकवण्याचा घाट मनुवादी सरकारने रचला असेल तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नेतृवाखाली राज्य महासचिव श्रावण गायकवाड, राज्य कायदेविषयक विभाग प्रमुख ऍड नितीन माने, नियोजना अंतर्गत राज्यभर तीव्र आंदोलन करेल असाही इशारा यावेळी डॉ. माकणीकर यांनी दिला.

अन्यायाविरुद्ध बंड पुकारण्याचा अधिकार संविधान देत असतानाही जर लोकशाहित तुम्ही आंदोलकांची कायद्याचे शस्त्र वापरून गळचेपी करत असाल तर ठाकरे सरकारला हे भारी पडेल असे मत माकणीकर यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here