



🔺……अन्यथा जनतेसह आंदोलन छेडण्याचा राष्ट्रवादी युवक काँग्रेस आष्टी शहर अध्यक्ष श्री राहुल डांगे यांनी दिला इशारा
✒️चामोर्शी(पुरोगामी न्युज नेटवर्क)
चामोर्शी(दि.19डिसेंबर):- आष्टी येथे पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत ग्रामीण पाणीपुरवठा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचे द्वारे 50 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी मौजा आष्टी नोकेवाडा चामोर्शी रोड को.ऑपरेटिव बॅंकेचे मागील बाजूस ठेकेदार मार्फत सदर टाकिचे बांधकाम अंदाजे सात.- आठ वर्षापूर्वी करण्यात आले परंतू पाण्याची टाकी लिकेज असल्याने या टाकीत पाण्याची साठवणूक करण्यात येत नाही व या परीसरातील जनतेला या टाकी द्वारे पिण्याच्या पाण्याची सोय आत्मसात करता येत नाही लिकेज असलेली टाकी दुरूस्ती ठेकेदारानी अजून पर्यत दुरूस्ती केलेली नाही सदर बांधकाम केलेली पाण्याची टाकी शोभेची वस्तू म्हणून उभी आहे.व या टाकी बांधकामाचे अंतिम देय रकम सदर ठेकेदारास दिल्याचे कळते आहे.
त्यामूळे या टाकीची दुरूस्ती वाऱ्यावर सोडून ग्रामपंचायत जनतेच्या मानवी मूल्ल्याची पायमल्ली करू पहात आहे का ? सदर पाण्याची टाकी लिकेज असल्याने जनतेच्या उपयोगात येत नाही आहे. ग्रामपंचायत ने ठेकेदारास अंतीम देय सुद्धा कसे काय दिले हा एक मोठा प्रश्न आहे.यात तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच.ग्रामसेवक ग्रामपंचायतीचे सदस्य ठेकेदार कडून तर छुप्या मार्गाने आर्थीक देवाण घेवाण केली नाही ना अशी शंका आष्टी येथील जनतेच्या मनात आहे.
या पाणी टाकीच्या बांधकामाची उच्चस्तरीय चौकशी केल्यास आष्टी ग्रामपंचायतीने बांधलेल्या गाळे बांधकामा प्रमाणे याही पाणी टाकीचा भ्रष्टाचार बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.हि पाण्याची टाकी ठेकेदारा मार्फत ग्रामपंचायतीने दुरूस्ती करून घ्यावे अन्यथा आष्टी येथील जनतेसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी यूवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री राहुल डांगे यांनी दिला आहे


