Home महाराष्ट्र लोणंद, कोरेगांव, पाटण, वडूज, खंडाळा या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रमुखपदी अनुप शहा

लोणंद, कोरेगांव, पाटण, वडूज, खंडाळा या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रमुखपदी अनुप शहा

88

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.18डिसेंबर):-भारतीय जनता पार्टीच्या वतीने होऊ घातलेल्या सातारा जिल्ह्यातील नगरपंचायत च्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेश चिटणीस अनुप शहा यांची निवड करण्यात आली आहे.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सूचनेनुसार प्रदेशाध्यक्ष हाजी एजाज, प्रदेश सरचिटणीस अतिक खान, प्रदेश सरचिटणीस जूनेद खान यांनी लोणंद, कोरेगांव, पाटण,वडूज, खंडाळा या नगरपंचायतीच्या निवडणूक प्रमुखपदी अनुप शहा यांची निवड केली आहे.

त्यांच्या निवडीबद्दल खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेचे सदस्या अँड. जिजामाला नाईक-निंबाळकर, विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, गटनेते अशोक जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे, तालुका भाजपा अध्यक्ष बजरंग नाना गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष नानासो इवरे, शहर चिटणीस निलेश चिंचकर, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष उषा राऊत यांनी अभिनंदन केले. तसेच त्यांचे सर्व परिसरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.

Previous articleकिसान सभेचा चुंबळी फाट्यावर रास्ता रोको, महावितरणाचा निषेध करत शेतकरी रस्त्यावर उतरले
Next articleजनाई नेत्र तपासणी केंद्र डोळ्या आजरासाठी ठरतोय वरदान-महेश विजयकुमार समगे(नेत्र सहाय्यक)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here