



🔹रक्तदान हेच श्रेष्ठदान समजून केले एकविस रक्तदात्यानी रक्तदान
✒️भास्कर फरकडे(चामोर्शी,तालूका प्रतीनिधी)मो:-9404071883
चामोर्शी(दि.17डिसेंबर):-तालूकयातील केवळरामजी हरडे महाविद्यालय चामोर्शी (राष्ट्रीय सेवा योजना विभाग),केवळरामजी हरडे कृषी महाविद्यालय चामोर्शी,नेहरू युवा केंद्र गडचिरोली आणि युवा संकल्प बहुउद्देशीय संस्था भेंडाळा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 16 डिसेंबर 2021 रोजी विजय दिना निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
यात एकूण 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले.कार्यक्रमाचे अतिथी शिवाजी महाविद्यालय चामोर्शी चे प्राध्यापक डॉ. मा. पंकज नरुले सर हरडे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच.पी. बनपूरकर,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. पवन रमेश नाईक,हरडे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दिनेश सुरजे, युवा संकल्प संस्था ग्रुप संस्थापक/अध्यक्ष मा.राहुल वैरागडे, उपाध्यक्ष मा.चेतन कोकावार,नेहरू युवा केंद्र गडचिरोली येथील वालंटियर कल्याणी गायकवाड युवा संकल्प पदाधिकारी व शिक्षक वृंद विद्यार्थी उपस्थित होते





