Home महाराष्ट्र महाराजस्व अभियानांतर्गत राजुरा बाजार येथे समाधान शिबिराचे आयोजन !

महाराजस्व अभियानांतर्गत राजुरा बाजार येथे समाधान शिबिराचे आयोजन !

286

🔹जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ हक्काचे व्यासपीठ — आमदार देवेंद्र भुयार

🔸शेकडो तक्रारींचा जाग्यावर निपटारा !

✒️वरुड(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

वरुड(दि.16डिसेंबर):-महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक, लोकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महाराजस्व अभियानात काही नवीन लोकभिमुख व प्रशासकीय घटकांचा सामावेश करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘समाधान शिब‌िर’चे आयोजन करून शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्यामुळे या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला विविध योजनांचा तत्काळ लाभ देण्याचा आमचा प्रयत्न असून ग्रामविकासासाठीदेखील हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र भुयार यांनी केले.राजुरा बाजार येथे “महाराजस्व अभियान अंतर्गत विस्तारित समाधान शिबीर, आमदार आपल्या दारी या कार्यक्रमाचे 16 डिसेंबर रोजी राजुरा बाजार येथील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा राजुराबाजार, येथे या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमा दरम्यान ग्राम राजुरा बाजार, अमडापुर, वडाळा, वंडली,वघाळ, गाडेगाव वाडेगाव,काटी या गावातील सर्वसामान्य नागरिकांच्या शकडो तक्रारी सोडविण्यात आल्या.

आमदार आपल्या दारी उपक्रमामध्ये राष्ट्रीय आरोग्य विभाग मार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र राजुरा बाजार, अंतर्गत कोविड – 19 लसीकरण केंद्र (लसीकरण नोंदणी कक्ष), प्रधानमंत्री मातृ वंदना योजना,राष्ट्रीय असंसर्गजन्यरोग नियंत्रण कार्यक्रम,आयुष्ममान भारत योजने अंतर्गत उपक्रम, सामाजिक वनिकरण विभाग अंतर्गत उपक्रम, मृदा व जलसंधारण उपविभाग अंतर्गत येणारे उपक्रम, आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आदिवासी लाभार्थ्यांना विविध योजणांची माहिती, शिक्षण विभाग पं. समिती मोर्शी, शिक्षण विभाग अंतर्गत योजना, शालेय पोषण आहार योजना, मोफत पाठयपुस्तक, मोफत गणवेष, अपंग समावेशित योजने अंतर्गत मोफत शस्त्रक्रिया, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, एकात्मिक बालविकास प्रकल्प योजना अंतर्गत उपक्रम, महावितरण – कृषिविज धोरण 2020 आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना अंतर्गत उपक्रम, पशुसंवर्धन विभाग योजना, जिल्हा माहिती बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत बाल संगोपन योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकुल योजना,शबरी घरकुल योजना, “ड” पत्रक यादी मधील घरकुल लाभार्थी नावे. समाजकल्याण विभाग अंतर्गत योजना, विशेषता अपंग बांधवांकरिता योजना. पुरवठा विभाग अंतर्गत राशन कार्ड तयार करुन लाभार्थी यांना वाटप करण्यात आले.

संजय गांधी, श्रावण बाळ योजना, निराधार योजना अनुषंगाने अंतर्गत प्रकरण तयार करुन प्रमाणपत्र लाभार्थी यांना वाटप करण्यात आले, राष्ट्रीय अर्थसहाय्य कुटुंब योजना अंतर्गत पात्र लाभार्थी यांना धनादेश वितरित करण्यात आले.

यावेळी आमदार देवेंद्र भुयार, जि. प. सदस्य राजेंद्र बहुरूपी, पं. स. सदस्य सिंधुताई करनाके, सरपंच राजुराबाजार निलेश धुर्वे, माजी पं स सभापती राजेंद्र कुकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळु पाटील कोहळे, माजी पं स सभापती निलेश मगर्दे ,भाऊराव गोमकाळे, भानुदास भोंडे, तंटा मुक्ती अध्यक्ष सुधाकर डाफे, सरपंच वघाळ सागर हरले, सरपंच अमडापूर सौ.गवईताई, उपसरपंच अमडापूर नितीन खापरे, उपसरपंच गाडेगाव सचिन सावरकर, ग्रा. पं. सदस्य किशोर गोमकाळे, मनोहर भोंडे, सौ. रजनीताई भोंडे, सौ. कल्पनाताई डाफे, सौ.विद्याताई कुईटे, सौ. प्रतिभाताई दाभाडे,
सौ. जयाताई निकम, सौ. सुचिताताई साबळे,प्रताप खापरे, दुर्वासपंत बहुरूपी, ओंकारराव बहुरुपी, बबलू श्रीराव, शुभम सोनारे, प्रविण वानखडे, सतिश भड,पिंटू बहुरूपी, भारत बहुरूपी, सागर भोंडे, नितीन बहुरूपी, सुनिल काकडे, रोषण माटे, उमेश देशमुख, पवन ठाकरे, सचिन शेळके, बाबारावजी घाटोळे, सुधाकर लांडे, रविंद्र बहुरूपी, प्रविण मांगूळकर,संजय साबळे, प्रविण नथुले, बाबारावजी भोंड, शिराजअली पटेल, मनोहरराव खरड, अनुराग देशमुख, संपतराव नागले, उत्तमराव कुसरे, अमोल वाघ तसेच ग्राम राजुराबाजार, अमडापूर, वडाळा, वंडली, वघाळ, गाडेगाव वाडेगाव, काटी येथील पदाधिकारी, ग्रा. पं. सदस्य,सहकारी,नागरिक आणि लाभार्थी व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here