Home महाराष्ट्र बान्सी येथे संविधान घराची स्थापना

बान्सी येथे संविधान घराची स्थापना

327

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

पुसद(दि.15डिसेंबर):-तालुक्यातील बान्सी ग्रामपंचायत कार्यालय येथे दि. १५ डिसेंबर२०२१ रोजी बान्सी गावाचे प्रथम नागरिक *युवा सरपंच श्री .गजानन नामदेवराव टाले यांच्या अध्येक्षतेखाली* आणि जेष्ठ विधिज्ञ, चार्वाक वनाचे संचालक ऍड.अप्पारावजी मैंद साहेब यांच्या मार्गदर्शनात *गाव तेथे संविधान घर* हा कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख *मार्गदर्शक अप्पाराव मैंद साहेब आणि प्रमुख पाहुणे म्हणुन गोवर्धन विठ्ठलराव मोहिते साहेब* संविधान चळवळीतील कार्यरत असलेले सुभाष दामाया सर , यशवंत देशमुख सर सोबतच जि.प.प्राथ. शाळा बान्सी येथील कृष्णाजी हरकर सर हे उपस्थित होते.

‘संविधान घर’ या कार्यक्रमाची सुरवात अगोदर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आलेल्या सर्व पाहुण्यांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला व कार्यक्रमासाठी जमलेल्या सर्व युवक मंडळीचे शब्दसुमनाने स्वागत करण्यात आले .

कार्यक्रमाच्या सुरवातीला बान्सी गावचे प्रतीष्ठीत नागरिक शाहीर ढगे गुरुजी यांनी अण्णाभाऊ साठे यांनी लिहलेल्या डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारीत गिताचे गायन केले व त्यानंतर आदरणीय गोवर्धन मोहिते सर यांनी भारतीय राज्यघटनेवर प्रकाश टाकला व युवकांना मार्गदर्शन केले
*कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय अँड.आप्पारावजी मैंद साहेब* यांनी *संविधानाची उद्देशीका* सर्व युवकांना समजावुन सांगितली व आपल्या जीवनात संविधानाच काय महत्व आहे .आपल्याला संविधानाने दिलेले अधिकार यांचे महत्व तसेच सरनाम्यातील संकल्पना अतिशय साध्या पद्धतीने सांगितल्या व बान्सी येथील गावकर्यांना *संविधान व महात्मा फुले यांची पुस्तके भेट दिली* .

त्यांनंतर कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण सरपंच गजानन टाले यांनी केले व आभारप्रदर्शन यशवंत देशमुख सर यांनी केले.
या कार्यक्रमाला गावातील अनेक युवक उपस्थित होते .

यावेळी नितेश तांबारे सर, नितीन डांगे सर, आदेश केवटे, गजानन केवटे, रामु रामावत,नारायण टाले,अविनाश मुजमुले, शेषराव कळंबे, शंकर पवार, अक्षय केवटे, बाळु मानतुटे, हेमंत बनकर, महेश खंदारे , मनोज आगलावे, शंकर डोंगरे, उमेश आगलावे , दशरथ आगोसे , गोपाल आसोले व गावातील इतर नागरिक उपस्थित होते.

Previous articleआमदार,खासदारांनी दिव्यांग निधी तात्काळ खर्च करावे – शिवानंद पांचाळ नायगावकर
Next articleधरणगाव महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध !…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here