Home महाराष्ट्र आमदार,खासदारांनी दिव्यांग निधी तात्काळ खर्च करावे – शिवानंद पांचाळ नायगावकर

आमदार,खासदारांनी दिव्यांग निधी तात्काळ खर्च करावे – शिवानंद पांचाळ नायगावकर

297

🔸नांदेड जिल्ह्यात पाच ते सात कोटी दिव्यांग निधी अखर्चीत

✒️नायगांव(पुरोगामी न्यूज नेटवर्क)

नांदेड(दि.15डिसेंबर):-जिल्ह्यात नऊ विधानसभा मतदारसंघ व तसेच विधान परिषदेचे दोन आमदार आणि दोन खासदार असुन, 12 जुलै 2016 च्या शासन निर्णयानुसार आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत प्रत्येक विधानसभा व विधान परिषदेच्या आमदारांनी प्रती वर्ष 10 लक्ष रुपये तर खासदारांनी प्रती वर्ष 25 लक्ष रुपये दिव्यांगावर दिव्यांग निधी दर वर्षी खर्च करणे बंधनकारक आहे. व तसेच दिव्यांग निधी हा ईतर कोणत्याही कामासाठी दिव्यांग निधी खर्च करता येत नाही. नांदेड जिल्ह्यातील मागील 5 ते 6 वर्षा पासुन जिल्ह्यातील आमदार, खासदार यांनी दिव्यांगावर हा दिव्यांग निधी खर्च केला नाही. असे मत शिवानंद पांचाळ नायगावकर यांनी व्यक्त केले आहे.

नांदेड जिल्ह्यात दिव्यांग मित्र अॅप मध्ये जवळ पास विस ते पंचवीस हजार दिव्यांग व्यक्तीनी ऑनलाईन नोंदणी केली आहे.

व तसेच नांदेड जिल्ह्यातील सर्व आमदार व खासदारांनी व तसेच माजी मुख्यमंत्री तथा पालकमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी सुध्दा दिव्यांगावर दिव्यांग निधी वेळेवर खर्च केला नाही. व तसेच कोरोणा संकट काळाच्या माहामारीत सुध्दा दिव्यांगाला कोणतीही आर्थिक मदत देण्यात आली नसल्याची खंत शिवानंद पांचाळ नायगावकर यांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here