Home महाराष्ट्र शरद यशवंत अस्मिता अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी

शरद यशवंत अस्मिता अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे- बाजीराव भैय्या धर्माधिकारी

296

✒️अतुल बडे(परळी वैजनाथ,प्रतिनिधी)

परळी(दि.14डिसेंबर):-राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांच्या संकल्पनेतून “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव-शरद यशवंत अस्मिता अभियान” ही योजना सुरु केली असून या अंतर्गत “दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर” आयोजित करण्यात आले आहे. अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.

उपजिल्हा रुग्णालय परळी वैजनाथ येथे दिनांक 17 डिसेंबर,24 डिसेंबर व 7 जानेवारी रोजी “दिव्यांग तपासणी व प्रमाणपत्र वाटप शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराच्या अनुषंगाने उपरोक्त तारखांना,उपजिल्हा रुग्णालयात ओ.पी.डी विभागामध्ये, बालरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, व अस्थीरोगतज्ज्ञ हे अपंग व्यक्तींची तपासणी करणार आहेत.

हे अभियान गरजुंना अधिकाधिक लाभदायक ठरावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी परळीच्या वतीने नगर परिषद गटनेते वाल्मिकअण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली “राष्ट्रवादी मदत कक्ष” स्थापन केले जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी , कार्यकर्ते या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दिव्यांग बंधू भगिनींना व्हावा यासाठी प्रयत्नशील आहेत. सर्वांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस परळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here