



🔹तहसीलदार सचिन खाडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले
🔸आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी भेट दिली
✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
गेवराई(दि.14डिसेंबर):-निराधारांचे प्रश्न संवेदनशीलता व जबाबदारीने मार्गी लावा, दोन वर्षापासून निराधारांचे प्रकरणे निलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, संजय गांधी निराधार समिती बरखास्त करा, राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेची प्रकरणे तात्काळ मार्गी लावा या आदी मागण्यासाठी आ.लक्ष्मण पवार यांनी आज येथील तहसील कार्यालयासमोर निराधारांसह आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा आ.पवार यांनी घेतला होता. दरम्यान दुपारी आंदोलनस्थळी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी भेट दिली. निराधारांचे प्रकरणे एकदिवसीय शिबीर आयोजित करुन प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्यासाठी त्यांनी उपविभागीय अधिकारी यांना आदेश दिल्यानंतर हे आंदोलन आ.पवार यांनी मागे घेतले.
गेवराई तालुक्यात मागील दोन वर्षात एकही संजयगांधी, श्रावणबाळ योजनेतील पात्र लाभार्थी निवड करण्यात आली नाही. तसेच तीन वर्षापूर्वी मंजुरी देण्यात आलेल्या हजारो पात्र लाभार्थ्यांना कुठलेही कारण नसताना या योजनेतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे निराधारांवर मोठा अन्याय झाला असल्याने आ.पवार हे आज दि.१३ रोजी येथील तहसील कार्यालयासमोर निराधारांसह उपोषणाला बसले होते. जोपर्यंत निराधारांचे प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा आक्रमक पवित्रा आ.पवार यांनी यावेळी घेतला होता.
दरम्यान दुपारी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी आंदोलनस्थळी भेट दिली.
यावेळी त्यांनी आ.पवार यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची कार्यालयात चर्चा करून प्रलंबित प्रकरणे तसेच फेटाळलेल्या अर्जाची कारणे तहसीलदार यांना मागितली. तसेच तालुक्यातील निराधारांसाठी येथील तहसील कार्यालयात शिबीर आयोजित करुन योग्य लाभार्थ्यांना त्याच दिवशी मंजुरी प्रमाणपत्र देण्याचे आदेश प्रशासनाला दिले.यानंतर तहसीलदार सचिन खाडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आ.पवार यांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह तालुक्यातील हजारो निराधार या आंदोलनात सहभागी झाले होते.


