Home महाराष्ट्र अमळनेर येथे पार पडला शिवधर्म व सत्यशोधक विवाह सोहळा..

अमळनेर येथे पार पडला शिवधर्म व सत्यशोधक विवाह सोहळा..

309

🔸खंडोबाची तळी भरून ‘सत्यशोधक विवाह’ सोहळ्याची सुरुवात…

🔹 सत्यशोधक वधु – वरांना महापुरूषांच्या जीवन ग्रंथाचा आहेर.

✒️पी.डी. पाटील सर(धरणगाव प्रतिनिधी)

धरणगांव(दि.14डिसेंबर):- धरणगावातील वैचारिक युवकांनी घेतला ऐतिहासिक सत्यशोधक विवाहाचा आनंद !… अमळनेर येथील सत्यशोधक उन्नती आणि सत्यशोधक उमेश यांनी समतेच्या विचारांनी प्रेरित सर्व बहुजन महापुरुष व महामातांचे स्मरण करून सुखी संसाराची शपथ घेतली. अतिशय उत्साहात आणि आनंदात वैचारिक शिदोरी घेऊन उन्नती आणि उमेश यांचा विवाह शिवधर्म व सत्यशोधक विवाह सोहळा अमळनेरकरांच्या साक्षीने संपन्न झाला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सत्यशोधक वंदना विश्वासराव पाटील (कापडणे परिवार) मु.पो. जानवे ता. अमळनेर यांची सुकन्या उन्नती आणि सत्यशोधक प्रतिभा प्रकाश पाटील (बोरसे परिवार) मु.पो. निपाणे ता. एरंडोल यांचे सुपुत्र उमेश यांचा विवाह सोहळा शिवधर्म व सत्यशोधक पध्दतीने मान्यवरांच्या उपस्थितीत काल अमळनेर येथे संपन्न झाला.

सुरवातीला खंडेरायाची तळी उचलून व भंडाऱ्याची उधळण करत मंगलमय वातावरणात विवाह सोहळ्याची सुरवात झाली. आलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींचे प्रबोधन व्हावे? तसेच सत्यशोधक विवाह ही काळाची गरज आहे…याबाबत प्रबोधन व्हावे म्हणून विवाह मंडपात मान्यवरांची मनोगते झाली. यामध्ये राष्ट्रीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.शिवाजीनाना पाटील, मराठा सेवा संघाचे प्रवक्ते आणि अभ्यासू वक्ते गंगाधर बनबरे, शिवव्याख्याते लिलाधर पाटील, लक्ष्मणराव पाटील, सत्यशोधक ॲड. सुरेश झाल्टे, शिवधर्म विवाह लावणाऱ्या शिवमती वसुंधरा लांडगे आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये सर्वांनी भारताची मूळ संस्कृती ही मातृसत्ताक असल्याचे मत मांडले. विषमतेला फाटा देत समतेच्या विचाराने मार्गक्रमण करणं, हिच खरी निकोप धर्मव्यवस्था आहे, असे ही मान्यवरांच्या बोलण्यातून जाणवले. विवाह मंडपात जेव्हा सत्यशोधक उन्नती व सत्यशोधक उमेश यांचे आगमन झाले तेव्हा अगदी सुरवातीला बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला माल्यार्पण व वंदन करण्यात आले. त्यांच्या प्रवेशाच्या वेळी पारंपरिक ‘बहारो फुल बरसाओ…’ ऐवजी सुंदर स्वागत गीताच्या चालीवर त्यांचे आगमन झाले. स्टेजवर जाण्याआधी स्वराज्य संकल्पक शहाजी राजे व माँसाहेब जिजाऊ – शिक्षण क्रांतीचे जनक तात्यासाहेब महात्मा फुले व माईसाहेब सावित्रीमाई फुले – समतेचे आधारस्तंभ विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून वंदन करण्यात आले.

स्टेजवर सत्यशोधक उन्नती व सत्यशोधक उमेश यांच्या बाजूला त्यांच्या आई – वडिलांना बसविण्यात आले. उन्नती ला पूर्वेकडून बसविण्यात आले कारण हिच खरी मातृसत्ताक संस्कृती आहे. शिवधर्म व सत्यशोधक विवाह सोहळा संपन्न करण्यासाठी नामदेव – तुकाराम वारकरी संस्थेचे प्रदेश अध्यक्ष ह.भ.प. गंगाधर महाराज कुरंदकर, शिवमती वसुंधरा लांडगे, सत्यशोधक भगवान रोकडे यांनी मंगलाष्टके म्हटली. महापुरुषांच्या व संविधानाच्या नावाने नवदाम्पत्यांना सावध करून ८ अष्टके म्हटली गेली. उन्नती व उमेश यांनी वैवाहिक जीवनाची मंगलमय सुरवात करण्यासाठी सर्व बहुजन महापुरुष व महामातांचे स्मरण करून समतेच्या विचारांची शपथ घेतली. आपल्या घरी आलेल्या व्यक्तीचे आपण स्वागत करतो म्हणूनच सर्वप्रथम नवरदेवाने नवरीच्या गळ्यात वरमाला टाकली.

लग्नाच्या सर्व रूढी परंपरांना फाटा देत सत्यशोधक पद्धतीने फुलांच्या अक्षता, पुस्तकांचा आहेर माहेर, पुस्तकांचे रुखवत असे वेगळंपण दिसून येत होते.
या विवाह सोहळ्यास आलेल्या बहुतेक पाहुण्यांनी वर – वधुंना आहेर म्हणून तुकोब्बाराय, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, अण्णाभाऊ व मान्यवर कांशीराम ह्या संत महापुरुषांचे अनमोल ग्रंथ आहेर म्हणून भेट देण्यात येत होते.

या क्रांतिकारी सोहळ्याला सुरुवातीलाच पुस्तकांचा स्टॉल लावण्यात आला होता यामध्ये विद्रोही बुक स्टॉल चे संचालक सुनील पाटील यांनी महापुरुषांचे जीवन ग्रंथ ठेवले होते. आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यासाठी सुखद पर्वणी होती. सर्वांनी महापुरुषांचे जीवन ग्रंथ घेतले.

या सर्व अनिष्ट प्रकारांना महात्मा जोतिराव फुले यांनी देशातील पहिला सत्यशोधक चळवळीचा सर्वोत्तम आणि समर्थ पर्याय म्हणून दि.२५ डिसेंबर १८७३ रोजी पुरोहिता शिवाय विवाह सोहळ्यास सुरुवात करून क्रांती घडवून आणली होती.

या क्रांतिकारक विवाह सोहळ्याला संपन्न करण्यासाठी अनेक वैचारिक मान्यवरांनी, नातेवाईक आणि मित्र परिवाराने परिश्रम घेतले. या विवाह सोहळ्याला यशस्वी करण्यासाठी ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभले त्या सर्वांचे सत्यशोधक प्रा. विश्वासराव विठाबाई भास्करराव पाटील (वधूपिता) यांनी आभार मानले. या ऐतिहासिक विवाह सोहळ्याला धरणगाव येथील मंडळींनी देखील आपली सक्रिय सहभाग नोंदवला. धरणगाव चे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे साहेब, सत्यशोधक डॉ. सुरेश झाल्टे, भगवान रोकडे, कैलास जाधव, रा.ओबीसी मोर्चाचे रा.कार्यकारिणी सदस्य आबासाहेब राजेंद्र वाघ, विकल्प ऑर्गनायझेशन चे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील, सुवर्णमहोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल चे आदर्श शिक्षक पी.डी.पाटील सर, हेमंत माळी सर, प्रोटान संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनिल देशमुख सर, बामसेफ चे सचिव आकाश बिवाल, भारत मुक्ती मोर्चाचे तालुकाध्यक्ष गौतम गजरे, राष्ट्रीय किसान मोर्चाचे शहराध्यक्ष गोरख देशमुख, सामाजिक कार्यकर्ते प्रफुल पवार, विक्रम पाटील, दिनेश भदाणे, समीर तडवी, राकेश पाटील, बुद्धिष्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे निलेश पवार, रा.मु. मोर्चाचे नगर मोमीन आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here