Home महाराष्ट्र खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे हस्ते 200 विधवा महिलांना मोफत...

खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे हस्ते 200 विधवा महिलांना मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप

219

🔸रोजगाराची संधी मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर उमटले समाधान!

✒️अतुल बडे(परळी प्रतिनिधी)

परळी(दि.13डिसेंबर):-परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मतदारसंघातील 200 विधवा महिलांना खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते मोफत पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले. यावेळी रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याने महिलांच्या चेहऱ्यावर समाधान उमटलेले पाहायला मिळाले.

उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त 15 जुलै ते 22 जुलै दरम्यान आयोजित सेवा सप्ताहात या महिलांची नाव नोंदणी करण्यात आली होती व आज खा. पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला या 200 महिलांना ना. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व हस्ते तसेच नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पिठाच्या गिरणीचे वाटप करण्यात आले.

*राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थीना धनादेश वितरित*

याच कार्यक्रमात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेतील 7 लाभार्थींना प्रत्येकी 20 हजार रुपयांच्या धनादेशाचे वितरण देखील ना. धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ना. धनंजय मुंडे यांच्या सह, जिल्हा परिषद गटनेते अजय मुंडे, न.प. गटनेते वाल्मिक अण्णा कराड, राष्ट्रवादी परळी मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंदराव देशमुख, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सौ. संगीताताई तुपसागर, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ चाचा पौळ, नगरसेवक दिपक नाना देशमुख, वैजनाथ सोळंके, सुरेश टाक, गोविंद कराड, सय्यद सिराज, अनंत इंगळे, चित्रा देशपांडे, अर्चना रोडे, श्रीकृष्ण कराड, नाझेर हुसैन, अनिल आष्टेकर, अझिज कच्छी, जयराज देशमुख, अय्युब पठाण, जाबेर खान पठाण, गोविंद कुकर, राजेंद्र सोनी, केशव गायकवाड, जयप्रकाश लड्डा, किशोर पारधे, तहसीलदार सुरेश शेजुळ, नायब तहसीलदार बाबुराव रुपनर यांसह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here