Home महाराष्ट्र तुषार बनसोडे यांची ‘लेफ्टनंट’ पदी नियुक्ती

तुषार बनसोडे यांची ‘लेफ्टनंट’ पदी नियुक्ती

301

✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी म्हसवड)मो:-9075686100

म्हसवड(दि.13डिसेंबर):-मोळ ता. खटाव’जि. सातारा येथील दिवंगत बाबुराव बनसोडे यांचे नातू व सीमा सुरक्षा दलाचे सेवानिवृत्त सैनिक श्री. अनिल बाबुराव बनसोडे यांचे चिरंजीव तुषार अनिल बनसोडे यांची आर्टलरी रेजिमेंट मध्ये ‘लेफ्टनंट’ पदावर भारतीय स्थलसेना मध्ये कमीशन झाले आहे.सरसेनापती राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत ध्वजसंचालना नंतर 11 डीसेबर 2021 रोजी देहरादून येथे हे कमिशन देण्यात आले.

नेशनल डिफेन्स अकादमी (NDA) पुणे व इंडियन मिलिटरी अकादमी (IMA) देहरादून येथील चार वर्षांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करून लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली.सैनिक स्कूल, सातारा येथून १२ वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नेशनल डिफेन्स अकादमी (NDA) पुणे येथे देशभरातून निवडक विद्यार्थ्यांमध्ये त्यांची निवड झाली.

अभिमानाची बाब आयु.अनिल बनसोडे यांचा दुसरा मुलगा शुभम याची गेल्यावर्षी जेईई मधून आयआयटी रुकडी येथे B.Tch(Computer Science) साठी निवड झाली असून सध्या तो द्वितीय वर्षामध्ये शिकत आहे.आयु.अनिल बनसोडे व त्यांच्या कुटुबियांनी आपल्या दोन्ही मुलांवर योग्य संस्कार मार्गदर्शन करुन उल्लेखनीय कार्य केले.याबाबत त्याचे सर्व नातेवाईक सध्या रहात असलेले सातारारोड गावी,मूळ गावी मोळ ,सातारा येथील ग्रामस्थांनी व सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातून तुषार यांचे अभिनंदन होताना दिसत आहे उध्या सातारा जिल्ह्याच्याच्या ठिकाणी सातारा येथे त्याचा भव्य सत्कार होणार आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here