Home महाराष्ट्र सक्तीची विजबिल वसुली, अतिवृष्टीग्रस्त मांजरसुंभा मंडळांच्या अनुदानासाठी शेतक-यांचे बैलगाडीसहीत चक्काजाम आंदोलन :-...

सक्तीची विजबिल वसुली, अतिवृष्टीग्रस्त मांजरसुंभा मंडळांच्या अनुदानासाठी शेतक-यांचे बैलगाडीसहीत चक्काजाम आंदोलन :- डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर*

50

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.9डिसेंबर):-महाराष्ट्र शासनाने रझाकारी पद्धतीने कृषिपंपाची विजतोडणी करून कोरोना कालावधीत आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांना वेठीस धरल्याच्या निषेधार्थ व तात्काळ विजजोडणी करण्यात यावी तसेच मांजरसुंभा महसुल मंडळातील २३ गावे खरीप हंगामातील अतिवृष्टीग्रस्त अनुदानापासुन वगळण्यात आली असून त्या गावातील शेतक-यांना अनुदान मिळावे या मागण्यांसाठी सामाजिक संघटना व सर्वपक्षीय मांजरसुंभा येथील राधिका हाॅटेल समोर धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बैलगाड्यांसह मांजरसुंभा चौकातुन राधिका हाॅटेल पर्यंत ताशाच्या गजरात घोषणा देत मोर्चा काढण्यात येऊन धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले .

सर्व शेतकरी बांधवांनी उत्स्फुर्तपणे आंदोलनात सहभाग घेतला विविध सामाजिक संघटनांचे तसेच राजकीय नेत्यांची समयोचित भाषणे झाली उपअभियंता ग्रामिण गुंजाळ, सपोनि नेकनुर पोलीस स्टेशन शेख मुस्तफा ,मंडळ आधिकारी इंगोले, मांजरसुंभा महसुल मंडळ यांना निवेदन देण्यात आले, आंदोलनात
सामाजिक कार्यकर्ते डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर, , प्रदेशउपाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा रमेशभाऊ पोकळे,भाजपा तालुकाध्यक्ष बीड स्वप्निल गलधर, तालुकाध्यक्ष भाजपा किसान मोर्चा बीड बाळासाहेब मोरे,भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष बीड, सौ. वैशालीताई चौरे,उपसरपंच कोळवाडी तुळशीदास महाराज शिंदे, युवा नेते मसु जाधव, सरपंच पालसिंगन विक्रम खंडागळे,सरपंच हिंगणी अंकुश गोरे,उपसरपंच चाकरवाडी, हनुमान चाळक, चेअरमन सेवा सोसायटी सात्रा पोपटराव हावळे, सरपंच बोरखेड बाळासाहेब गावडे, अशोक घोडके, दत्ता जगदाळे, माजी सरपंच शहाजी आण्णा घोडके, बाळासाहेब ढास,नाना चव्हाण, काशिनाथ मांडवे,संभाजी कदम, महादेव नाईकवाडे,विष्णु सुरवसे महाराज, आजिनाथ घरत, दादासाहेब वाघमारे,राहुल खोसे,कल्याण कागदे, आदमी पार्टी जिल्हाध्यक्ष बीड माजी सैनिक अशोक येडे, भाजपा युवा नेते अशोकदादा रसाळ, शिवबा सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष हनुमान मुळीक,सामाजिक कार्यकर्ते डाॅ.संजय तांदळे, वंचित बहुजन आघाडीचे सहसचिव शेख युनुस च-हाटकर, वंचित नेते संदिप जाधव, सामाजिक कार्रकर्ते मोहंमद मोईज्जोदीन, सय्यद आबेद बीडकर,अड.बळवंत कदम, सरपंच बोरखेड गावडे,सरपंच गोरे, रौळसगावचे म्हसु जाधव,सफेपुरचे अशोक घोडके,नाना चव्हाण, बप्पा रसाळ, वामन मुंडे, दत्ता रसाळ, महेश कोकाटे,आकाश रसाळ, जगदिश रसाळ, अर्जुन येडे, विलास मोरे, लक्ष्मण जोगदंड, संदिप कागदे, संतोष जोशी आदिं सहभागी होते.

आंदोलनापुर्वी सरसेनाध्य बिपिन रावत व आधिका-यांना श्रद्धांजली तर रूग्णवाहिकांना रस्ता दिला
____
चक्काजाम आंदोलनापुर्वी सरसेनाध्य स्व . बिपिन रावत व हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेल्या लष्करी आधिका-यांना श्रद्धांजली वाहण्यात आली याचवेळी आलेल्या रूग्णवाहीकेसाठी आंदोलकांनी रस्ता करून देत माणुसकीचे दर्शन घडवले.

सरकारची दिशाभूल व शेतक-यांना वेठीस धरण्याचा प्रकार निंदनीय, महावितरण आधिका-यांच्या कार्यालयात जागरण गोंधळ:- रमेश पोकळे
___
शिवछत्रपतीचे नाव घेऊन चालणारे महाविकास आघाडीचे सरकार शेतक-यांप्रती असंवेदनशील असून कोरोनामुळे व अतिवृष्टीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतक-यांच्या कृषिपंपाचे वीज कनेक्शन तोडुन सक्तीची विजबिल वसुली निषेधार्ह असुन सरकारने शेतक-यांचा सहानुभूतिपूर्वक विचार करून विज कनेक्शन जोडणी व खरीप हंगामातील अतिवृष्टीग्रस्त मांजरसुंभा मंडळातील २३ गावे अनुदानापासुन वगळण्यात आली असून त्यांच्यावरील अन्याय कदापिही सहन केला जाणार नाही, लवकरच बीड महावितरण आधिका-यांच्या कार्यालयात जागरगोंधळ घालण्यात येईल.

सरकार व महावितरण आधिका-यांकडुन शेतक-यांची दिशाभूल व आर्थिक फसवणूक:-डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
___
उपमुख्यमंत्री अजितदादा प्रचारा दरम्यान तेलंगणा २४ तास विज देते, शेथक-यांना सवलत देते तर महाराष्ट्र सरकार का नाही देऊ शकत असे म्हणणारे अजितदादा सत्तेवर येताच शब्द फिरवतात, ऊर्जामंत्री नितिन राऊत शेतक-यांविषयी अपमानास्पद बोलतात महावितरणचे आधिकारी दिलेला शब्द फिरवतात एकंदरीतच सत्तेचा अहंकार राजकीय नेते मश्गुल असुन शेतक-यांप्रति यांच्या संवेदना मृत पावल्या असल्याचे निदर्शनास येते.

महावितरणच्या आधिका-यांनी शेतक-यांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हे दाखल करा:-बाळासाहेब मोरे
____
भाजपा किसान मोर्चाचे बीड तालुकाध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी महावितरणचे आधिकारी दिलेला शब्द पाळत नाहीत, पालिच्या धरणामध्ये जलसमाधी आंदोलन दरम्यान कार्यकारी अभियंता निकम व उपअभियंता ग्रामिण गुंजाळ यांनी अधिक्षक अभियंता कोलप यांच्याशी फोनवरून संपर्क साधत प्रता रोहीत्र २५,००० रू भरल्यानंतर विज जोडणी करण्याचे दिलेले जाहीर आश्वासन पाळत नाहीत, महावितरणचे आधिकारी-कर्मचारी शेतक-यांना अपमानास्पद वागणूक देत मुजोरपणा करतात, शासकीय विज कायदा नियमांचे उल्लंघन केले जाते, काही प्रश्न विचारल्यास अरेरावीची भाषा वापरत गुन्हे दाखल करण्याची भाषा बोलली जाते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here