Home महाराष्ट्र भारतीय बौद्ध महासभा दिग्रस तर्फे काव्य वाचन व गीत गायन स्पर्धांचे आयोजन

भारतीय बौद्ध महासभा दिग्रस तर्फे काव्य वाचन व गीत गायन स्पर्धांचे आयोजन

63

✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)

दिग्रस(दि.9डिसेंबर):- भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा दिग्रस तर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा ६५ वा महापरिनिर्वाण दिन,सूर्यपुत्र भैय्यासाहेब उर्फ यशवंतराव आंबेडकर यांची १०९ वी जयंती व वामनदादा कर्डक यांची १०० वी जयंती प्रित्यर्थ काव्य वाचन व गीतगायन स्पर्धांचे आयोजन दिनांक – १९ डिसेंबर २०२१ रोज रविवारी दुपारी १२ वाजता डॉ .बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पडगिलवार ले -आऊट येथे केले आहे.

या दोन्ही स्पर्धामध्ये प्रथम ७००रुपये द्वित्तीय ५००रुपये. तृतीय ३००रूपये बक्षिस ठेवले आहे.

तरी या दोन्ही स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विनायक देवतळे व सरचिटणीस एकनाथ मोगले यांनी केले आहे.
नियम- १) एका स्पर्धकाला एकाच स्पर्धेत भाग घेता येईल.२) कविता समाज प्रबोधनपर असावी ( प्रेम कविता सादर करता येणार नाही.) ३) गीत फक्त वामनदादा कर्डकचेच असावे ( ही अट असेल.) ४) कवितेची एक प्रत स्पर्धेच्यापूर्वी आयोजकांकडे सादर करावी लागेल.५) गीत गायन व काव्य वाचन दोन्ही करिता स्वतंत्र बक्षिस रोख रक्कम व प्रमाणपत्र दिले जाईल.६) स्पर्धकांनी आपली नावे आयोजकांकडे नोंदवावी.

मो.८२०८६६८१७४,मो.९८८१५५२३२७,
काव्यवाचन:१) प्रथम बक्षिस ७००रूपये,आयु.उज्वलाताई महेन्द्र मानकर यांचे तर्फे २) द्वित्तीय बक्षिस ५००रूपये. प्रा मधुकर वाघमारे यांचे तर्फे ३) तृतीय बक्षिस ३००रुपये नंदू गुजर यांचे तर्फे
गीतगायन : १) प्रथम बक्षिस ७००रुपये. प्रदिप नगराळे यांचे तर्फे २) द्वित्तीय बक्षिस ५००रुपये. राजेंद्र वाघमारे विभागीय अध्यक्ष कास्ट्राईब संघटना अमरावती विभाग यांचे तर्फे ३) तृतीय बक्षिस ३००रूपये. रमेश वहीले यांचे तर्फे तरी स्पर्धकांनी आपली नावे आयोजकांकडे त्वरीत नोंदवावी.

Previous articleसक्तीची विज वसुली विरोधात घंटानाद आंदोलन करणार.
Next articleखा. शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त परळीत धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वात 11 व 12 डिसेंबर रोजी शरदोत्सवाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here