



✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.9डिसेंबर):-तालुक्यातीलडोंगर भागातील शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडूनये अन्यथा डोंगरी जन परिषदेच्या वतीने दि१३डिसेंबर २०२१वार सोमवार रोजी उप अभियंता महावितरण कार्यालय गंगाखेड समोर डोंगर भागातील शेतकऱ्यांचे घंटानाद आंदोलन केले जाणार आहे डोंगर भागातील शेतकऱ्यांचे ऐन रब्बी हंगामात शेतीपंपाचे सक्तिच्या विज वसुलीच्या नावाखाली भरमसाठ विजबिल वसुली महावितरण उपविभागा गंगाखेड मार्फत वसुली केली जात असुन शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडले जात आहेत.
सक्तीची विज वसुली बंद करून शेतकऱ्यांचे शेतीपंपाचे विज कनेक्शन तोडूनये तोडलेले विज कनेक्शन ताबडतोब जोडण्यात यावेत यासाठी डोंगर भागातील शेतकऱ्यांचे डोंगरी जन परिषदेच्या वतीने दि.१३डिसेंबर २०२१ रोज सोमवार पासून उप अभियंता महावितरण कार्यालय गंगाखेड समोर बेमुदत घंटानाद आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन मा तहसीलदार व उप अभियंता महावितरण कार्यालय गंगाखेड यांना देण्यात आले निवेदनावर डोंगरी जन परिषदेचे मुख्य संयोजक पंडितराव घरजाळे आश्रोबा दत्तराव सोडगीर पंडित निवृत्ती सोडगीर गोविंद निळकंठ मुंडे बालासाहेब प्रभाकर सोडगीर केशव भेंडेकर दशरथ मोटे शिताराम देवकते बाबुराव नागरगोजे भास्कर सांगळे दादासाहेब खांडेकर जगन्नाथ मुंडे आप्पासाहेब रुपनर बालासाहेब गुट्टे शंकर आण्णा रुपनर हारीभाऊ अवचार बापुराव भालेराव भगीरथ फड दत्ता आयनिले आदि शेतकरी बांधवांच्या वतीने देण्यात आले





