Home महाराष्ट्र अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी नोकरीची सुवर्ण संधी

अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी नोकरीची सुवर्ण संधी

115

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

गडचिरोली(दि.8डिसेंबर):- टाटा इलेक्ट्रॉनिक प्रा. लि. क्रीष्णागिरी, तामिलनाडू यांच्यावतीने ENTRY LEVEL OPERATOR या पदाकरीता इयत्ता 12 वी विज्ञान/कला/वाणिज्य या शाखेतून उत्तीर्ण झालेल्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली व जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी नोकरीची सुवर्ण संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सदर पदाकरीता वय 18 ते 20 वर्ष (01/09/2021 रोजी) वयोगटातील व कमीत कमी वजन 45 किग्रॅ. व उंची 145 सेमी असणाऱ्या मुली यासाठी पात्र ठरणार आहेत.

सदर पदाकरीता आवेदन पत्र भरण्याची अंतिम तारीख 10 डिसेंबर 2021 पर्यंत असून सदरचे आवेदन पत्र एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली तसेच शासकीय/अनुदानित आश्रमशाळा व शासकीय वसतीगृहामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेले असून तेथे भरुन सादर करावे. अर्जासोबत इयत्ता 12 वी उर्त्तीण गुणपत्रिका, टि.सी., आधार कार्ड, व अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राची झेरॉक्स प्रत जोडावी. असे आवाहन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, गडचिरोली आशिष येरेकर यांनी केले आहे.
****

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here