




✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.8डिसेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) समातादुत प्रकल्पाअंर्तगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरनिर्वाण दिनाचे औचित्य साधून *”महामानव विचार संविधान साक्षर अभियान”* नालंदा बुद्ध विहार कंळब जिल्हा यवतमाळ येथे सकाळी सहा ते सायं सहा वाजेपर्यंत अखंड वाचन करुन बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी समतादुत रूपेश वानखडे यांनी “ग्रंथकार व ग्रंथप्रेमी डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषय मार्गदर्शन केले.
“बुद्ध विहारे हे ग्रंथालय झाले पाहीजे असे मत व्यक्त केले” व बार्टी प्रकाशनाचे ग्रंथ साहित्य उपलब्ध करून दिलेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयकुमार भवरे (तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा कळंब.) प्रमुख पाहुणे सुगत नारायणे (शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी कळंब), रोमांत पाटील समता (सैनिक दल तालुका शाखा कळंब) ऍड.धम्मरत्न तेंलगे उपस्थित होते.
आदर्शाचे पूजन करुन अखंड वाचनाला सुर्वात करण्यात आली .सहभाग शुभम पिसे, पंकज लढे,सचिन पाटील,राजेद्र बलविर,आकाश मोरे, पियुष जवादे, अमित पिसे,सीमा थोरात,प्रगती इंगळे, चंदन कांबळे, समीर शेख, बबलू वाघमारे,भरत नेहारे, शिल्पा पाटील,सोनाली तेंलगे,करूणा थुल,श्रुती बुरबुरे, रामजी पाटील ,सचिन भगत ,आयुष बुरबुरे, विनोद मेश्राम ,विशाल शिंदे,कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचीन पाटील यांनी तर आभार शुभम पिसे यांनी मानले.




