




✒️सिरसाळा(पुरोगामी न्युज नेटवर्क)
सिरसाळा(दि.8डिसेंबर):-येथील श्री पंडित गुरु पार्डीकर महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने दि. 06 डिसें. सोमवार रोजी *महापरिनिर्वाण दिन* साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्राचार्य डॉ. एच. पी. कदम, संस्थासाचिव प्रा. योगेश कदम, श्री गौस कुरेशी व प्रमुख मार्गदर्शक प्रा दयानंद झिंजुर्डे यांच्या हस्ते महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर’ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना प्रा दयानंद झिंजुर्डे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.
विद्यार्थ्यानी जीवन जगत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श घेऊन ज्ञानार्जन केले पाहिजे आसे मत मांडले. तसेच “भीम झिजला कसा.. अंत झाला कसा … चंदनाला पुसा…” हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ हरीभाऊ कदम यांनी केला.या कार्यक्रमाचे प्रस्ताविक कार्यक्रमाधिकारी डॉ. जयदीप सोळुंके, सूत्रसंचालन डॉ संजय फुलारी यांनी केले तर आभार प्रा अरूणा वाळके यांनी मानले.
या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




