



✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114
ठाकर आडगांव(दि.8डिसेंबर):-देशातील ग्रामीण भागातील असंघटित क्षेत्रातील कामगारांना मुख्य प्रवाहात आणणे आणि त्यांना सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारने ई- श्रम पोर्टल सुरु केलं आहे. विशेषत: कोरोना काळात असंघटित क्षेत्रातील कामगारांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. भविष्यात त्यांना अशा प्रकारे पुन्हा अडचणींना सामोरं जावं लागू नये यासाठी केंद्र सरकारने हे पाऊल उचललं आहे. असंघटित कामगारांचे 04 डिसेम्बर 2021 पासून ठाकर आडगाव येथील संध्या मल्टी सर्व्हिसेस या ठिकाणी ई श्रम नोंदणी अभियान राबवण्यात येणार आहे,तरी सर्व असंघटित कामगारांसाठी म्हणजेच काम करणारे लहान शेतकरी/ शेतमजूर, पशुपालन करणारे, विडी कामगार, बांधकाम कामगार, सेंट्रिंग कामगार, लेदर कामगार, सुतार, वीटभट्टीवर काम करणारे, न्हावी.
घरगुती कामगार, भाजीपाला विक्रेते, फळ विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, हातगाडी ओढणारे, ऑटो रिक्षाचालक, घरकाम करणारे कामगार, आशा कामगार, दूध बी उत्पादक शेतकरी, सामान्य सेवा केंद्रचालक, स्थलांतरित कामगार, भाजीपाला विक्री करणारे यासारखे असे अनेक लोक आहेत.आणि असंघटित कामगार नोंदणी या सरकारने असंघटित कामगारांच्या सुरक्षेसाठी कामगारांची नोंदणी करण्याचे ठरविले आहे. यासारखे असे अनेक लोक आहेत त्यांची शासनाकडे नोंद नाही. त्या मुळे जे कामगार जास्त प्रमाणात आहेत,त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आव्हान ठाकर आडगाव चे सरपंच श्री जगदीश काळे,आणि सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन सुधाकर कोकाट,व संध्या मल्टी सर्व्हिसेस चे बाबु (त्रिंबक)कोकाट यांनी केले आहे,





