




कुठे शोधू कुठे मी तुला
दिसेनासे रे तू विठ्ठला
मनी माझ्या ध्यास रे तुझा
मला भेटणार तू रे कसा
पंढरी ही तुझा निवारा
घरी माझ्या रे तुझा पसारा
कधी नेशील रे तू मला
घर तुझे मला बघावयाला.
वाटे माथा तुझ्या चरणाशी
भक्ती केली तुझ्या हृदयाशी
खेळ केलाय माझ्या भावनांचा
नको आखू रे डाव परीक्षांचा
कुठे शोधू कुठे मी तुला
दिसेनासे रे तू
विठ्ठला
दिसेनास रे तू विठ्ठला……
✒️शब्दांकन:-कु. सानिका विनायक शिंदे(मो:-8459810399)वर्ग 9 वा भगवती देवी विद्यालय, देवसरी उमरखेड




