



🔸संतोषभाऊ मुरकुटे यांच्या तर्फे न्यायालयात जनहीत याचीका दाखल
✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)
गंगाखेड(दि.8डिसेंबर):- विधानसभेतील शेतकऱ्यांना जोपर्यंत खरीप व रबी 2021या वर्षाचा पिक विमा मिळत नाही तोपर्यंत त्यांच्या हक्कासाठीचा लढा चालूच ठेवणार असे
दिनांक ०७ डिसेंबर रोजी तहसील कार्यालय गंगाखेड येथे आयोजित एक दिवशीय धरणे आंदोलनात संतोष मुरकुटे यांनी बोलताना व्यक्त केले.या धरणे आंदोलनात गंगाखेड ,पालम, पूर्णा या तिन्ही तालुक्यातील अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते. गंगाखेडसह जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 2020 खरीप हंगामातील पिक विमा तिन्ही तालुक्यातील एकुण 89 कोटी रुपये मंजूर झाला असून शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्यापही जमा झाला नाही. हा पिक विमा तात्काळ मंजूर करून जमा करण्यात यावा.
खरीप 2021 सालचा नुकसानग्रस्त शेतकर्यांना सरसकट पिक विमा देण्यात यावा.2020 आली तुर पीकाचा मंजूर पिक विमा तात्काळ देण्यात यावा. थकबाकी च्या नावाखाली शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा खंडित करू नये.जळालेले डीपी चार दिवसात बसवावेत.रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मनमानी कारभार करत असुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे.या मागणीचे निवेदन तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री यांना देण्यात आले.
या मागणीसाठी गंगाखेड तहसील कार्यालयासमोर संतोष भाऊ मुरकुटे व सर्व शेतकरी बांधव यांच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा मिळवण्यासाठी संतोष मुरकुटे यांच्या वतीने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली असून या न्यायालय लढाईची सुरुवात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आज करण्यात आली आहे. गंगाखेड विधानसभेतील शेतकऱ्यांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यं संतोष भाऊ मुरकुटे मित्र मंडळ स्वस्त बसणार नाही यापुढील उग्र आंदोलनाचा इशाराही यावेळी प्रशासनाला देण्यात आला.


