



✒️धरणगाव प्रतिनिधी(पी.डी.पाटील सर)
धरणगाव(दि.8डिसेंबर):-येथील बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयातील १८ वर्ष आतील मुलींच्या गटातून जिल्हा स्तरावर झालेल्या कॉसकंट्री अजिंक्यपद स्पर्धेत शाळेतील कु. रूपाली विजय कुंभार ही जिल्ह्यातून प्रथम व कु. प्रीती तापीराम इंगळे ही द्वितीय आली यांनी 3 किलो मीटर धावण्याच्या स्पर्धेत जिल्हा स्तरावर घवघवीत यश संपादन केले. त्यांची आता राज्यस्तरावर निवड झालेली आहे.
त्यांच्या निवडीबद्दल संस्थेचे सचिव प्रा. रमेश महाजन यांनी विद्यार्थिनी खेळाडूंचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं व पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे अध्यक्ष मा हेमलाशेठ भाटिया व उपाध्यक्ष अंकुश पाटील तसेच संचालक मंडळ यांनी सुद्धा त्यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक एस. एस.पाटील व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक जीवन पाटील तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थिनींना क्रीडाशिक्षक एस.एल. सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.


