



🔹कॅन्डल मार्च विनम्र अभिवादन रॅली काढण्यात आली
✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी,यवतमाळ)मो:-9823995466
उमरखेड(दि.7डिसेंबर);-तालुक्यातील डोंगरगाव जि. यवतमाळ मधील दि. 6 डिसेंबर 2021 रोजी नालंदा बहुउद्देशीय बुद्ध विहार येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाची सुरुवात तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून त्रिवार वंदन करण्यात आले.पोलीस निरीक्षक भगत साहेब यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रकाश टाकून सर्वांना मार्गदर्शन केले.
यावेळी यश हापसे (पॅंथर ग्रुप अध्यक्ष), सागर ढेपे (पॅंथर ग्रुप उपाध्यक्ष)भगवान ढेपे, नागेश ढेपे, दत्ता काळबांडे, संजय काळबांडे, गजानन ढेपे, चक्रधारी ढेपे, जळवा ढेपे, शोभाबाई ढेपे, भारतबाई काळबांडे, ज्योती शिरबिडे, सीमा सावकर, सारिका हापसे, अमोल ढेपे, इत्यादी अनेक तरुण मंडळी व बालक बालिका यावेळी उपस्थित होते.तर सायंकाळी 7 वाजता गावामधून विहारा पर्यंत भव्य कॅन्डल मार्च विनम्र अभिवादन रॅली शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आली.
यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कृष्णा राठोड, अजय राठोड (पोलीस निरीक्षक) यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यामध्ये सर्व गावकरी भिम अनुयायी बालक बालिका तरुण मंडळी सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल काळबांडे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी केले तर आभारकुंडलिक हापसे (वंचित बहुजन आघाडी शाखाध्यक्ष) यांनी मानले.


