



✒️सचिन सरतापे(प्रतिनिधी,म्हसवड)मो:-9075686100
म्हसवड(दि.8डिसेंबर):-शुन्यातून विश्वनिर्मितीकडे यशस्वी वाटचाल करणाऱ्या व मुंबई सह महाराष्ट्राचा नावलौकिक वाढविणाऱ्या धनगर समाजातील कर्तृत्वान व्यक्तींना मुंबई येथील पुण्यश्लोक फाउंडेशन व धनगर माझा परिवाराच्या वतीने महाराजा यशवंतराव होळकर जयंती निमित्ताने दरवर्षी मुंबई भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यावर्षी माण तालुक्यातील तिघांना मुंबई भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. माण तालुक्यातील एकाच ठिकाणी तिंघाचा मुंबई भुषण पुरस्काराने सन्मानित केल्याने माणदेशी बाणा मुंबईत ही दिसून आला.
माण तालुक्यातील बनगरवाडीचे सुपूत्र व मुंबई आयकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे साहेब , विरकरवाडीचे सुपूत्र व आदर्श शिक्षक प्रा. हिरा रांखुडे व नरबटवाडीचे सुपुत्र व मुंबई मनपाचे सहा.अभियंता गणेश नरबट या तिघांना रविवार दि.५ डिसेंबर रोजी मुंबई येथे टीव्ही स्टार अभिनेते मा.श्री. सुमित पुसावळे (कलर मराठी टिव्ही फेम बाळूमामाच्या नावाने चांगभलं ) यांच्या शुभहस्ते मुंबई भुषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.दुष्काळी भागातील या माणदेशी माणसांंनी महाराष्ट्राची राजधानी मुंबई सारख्या शहरात या तिघांनी माणदेशी बाणा दाखवून दिला आहे. डॉ. नितीन वाघमोडे , प्रा.हिरा रांखुडे व गणेश नरबट यांना मुंबई भुषण पुरस्कार मिळाल्याने माण तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे.
पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले आहे.
यावेळी युवराज यशवंतराव होळकर (होळकर घराण्याचे वंशज ) खा. पदमश्री डॉ. विकास महात्मे , मुंबई मनपा महापौर किशोरीताई पेडणेकर , खा. सुप्रियाताई सुळे , खा. राहुल शेवाळे , आ. आषिश शेलार , आ. रामहरी रुपनवर , आ. गोपीचंद पडळकर , रासपचे महासचिव बाळासाहेब दोलतडे , यशवंत सेना सरसेनापती माधव गडदे , पनवेल महानगरपालिकाच्या महिला बालकल्याण समितीच्या सभापती सौ. मोनिकाताई महानवर , ठाणे पोलिस आयुक्त बाळासाहेब वाघमोडे , पुणे पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे आदी मान्यवर उपस्थित होते.सुरूवातीला पुण्यश्लोक फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व धनगर माझाचे संपादक धनंजय तानले यांनी प्रास्ताविक केले. अनिल राऊत यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले तर दादासाहेब पुकळे यांनी आभार मानले.





