Home महाराष्ट्र परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अभिवादन सभा

परमपूज्य बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन अभिवादन सभा

109

✒️शांताराम दुनबळे(नाशिक,जिल्हा प्रतिनिधी)

नाशिक(दि.8डिसेंबर):- नाशिक रोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी रमाई महिला मंडळ अध्यक्षा जिजाबाई हिरे व प्रशांत पगारे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदना घेण्यात आली , यानंतर सय्यद पिंपरी तालुका जिल्हा नाशिक येथील डॉ . आंबेडकरांनी यांच्या अस्थी स्तुपास आभिवादन साठी सर्व उपासक रवाना झाले त्या ठिकाणी प्रतिमा पुजन व बुद्ध वंदना भिमस्तुती व शालेय विद्यार्थ्यांसाठी पेन वाटप मंचच्या वतीने करण्यात आले. या ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ स्तुप समितीच्या वतीने आभिवादन व भोजनदान करण्यात आले.

अभिवादक ची उपस्थित डॉ .बाबासाहेब आंबेडकर विचार मंच नाशिक सर्व पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष अरुण शेजवळ,जिल्हा अध्यक्ष प्रशांत पगारे,नाशिक शहर अध्यक्ष प्रतिभा तायडे,उपाध्यक्ष सुनंदा पवार,कार्याध्यक्ष कुसूमताई महिरे,कार्याध्यक्षा शीलाताई पाटील,संघटक कल्पना ताई तपासे,सल्लागार प्रा.सुनिता वाघमारे/ पगारे, प्रवीण गांगुर्डे , निलिमाताई बिराडे, बिराडे मॅडम ,सभासद विवेक अव्हाड,सभासद रुपाली उनवणे तसेच स्थानिक ग्रामस्थ अंकुश निकम व महेंद्र निकम स्तुप समितीच्या वतीने आभिवादन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here