




✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.7डिसेंबर):- शहरालत असलेल्या श्रीरामपूर येथील डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कॅन्डल मार्च आयोजन करून अभिवादन करण्यात आले .
श्रीरामपूर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथून सायंकाळी ठिक ६ वाजता कॅडल मार्च महात्मा फुले चौक, तीन पुतळा चौक, छत्रपती शिवाजी महाराज, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक या मार्गाने डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ पर्यंत आयोजन केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून सामूहिक त्रिवार वंदन करण्यात आले.
या मार्चचे आयोजन सनी पाईकराव ,नितेश पाईकराव, गौरव धुळधुळे ,शुभम खंदारे , अजय खंदारे यांनी केले.यावेळी उपासक-उपासिका बालबालिका व तसेच ईत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.




