




✒️सिध्दार्थ दिवेकर(जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ)मो;-9823995466
उमरखेड- ढाणकी(दि.7डिसेंबर):-डॉ. बाबासाहेब आंबेडकर (14 एप्रिल, 1891 – 6 डिसेंबर, 1956) हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजनीतिज्ञ, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. बहुजन चळवळीला प्रेरणा दिली.आणि अस्पृश्य लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली. तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते.देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.
यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2021 रोजी ढाणकी येथे मध्यरात्री बारा वाजून दोन मिनिटाला परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला येथे अभिवादन करण्यात आले.यावेळी उपस्थित बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्कचे तालुकाध्यक्ष प्रकाश कांबळे, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष रामराव गायकवाड व बौद्ध धम्म प्रचारक ललिताबाई आनंदा मुनेश्वर, बेबाबाई पाईकराव, बुधिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क महिला विंग च्या सीमा कांबळे, वनिता गायकवाड, प्रमिलाबाई गायकवाड, रेखाताई पाईकराव, राजू पाटील, बामसेफ चे मिलिंद चिकाटे, प्रकाश पाईकराव
भारतीय युवा मोर्चा चे तालुकाध्यक्ष अमोल पाटील यांसह,
आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आवारामध्ये कॅन्डल मार्च व डॉ.आंबेडकर स्मारकास अभिवादन करण्यात आले.महामानवाच्या नावाचा केवळ जयजयकार न करता त्यांचे राहिलेले आधूरे कार्य पूर्ण करू हा संकल्प सुध्दा यावेळी उपस्थित अनुयायांच्या वतीने घेण्यात आला.यावेळी उपस्थित मान्यवरांनी महामानवास अभिवादन करीत. सामजिक एकोप्याचा आणि सामजिक जागृतीचा संदेश यावेळी देण्यात आला




