Home बीड बीड शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या ‘युद्धात’ गेवराईचीच ‘जीत’ होण्याची शक्यता!

बीड शिवसेना जिल्हाप्रमुख पदाच्या ‘युद्धात’ गेवराईचीच ‘जीत’ होण्याची शक्यता!

95

✒️गेवराई प्रतिनिधी(नवनाथ आडे)मो:-9075913114

गेवराई(दि.7डिसेंबर):-शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलीक खांडे यांच्या पदाला शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिल्यानंतर या पदावर वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी लोकप्रतिनिधींसह पक्षाच्या पदाधिकार्‍यांकडे लॉबिंग करायला सुरुवात केली होती.अनेकजण आपआपल्या पद्धतीने शिवसेनेतील पदाधिकार्‍यांच्या भेटी घेऊन बीडचे जिल्हाप्रमुख पद पदरी पाडण्याचे मनसुबे आखत होते. परंतु शिवसेनेने या वेळेस मात्र बीड जिल्हाप्रमुखाची निवड करण्यासाठी अनेक अपेक्षा ठेवल्या असून तो पारदर्शक असावा, कर्तृत्व चांगलं असावं, दांडगा जनसंपर्क, शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी झटून काम करावं, याचबरोबर शिक्षणाची पात्रताही या वेळेस लक्षात घेतली जात आहे.

मात्र या निवडीसाठी जिल्ह्यात मोठी ताकद असणारे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी अनेक नावाच्या शिफारसी केल्यानंतर पक्ष श्रेष्ठी आणि सामान्य कार्यकर्त्यातून पुढं आलेलं साजेसं नाव म्हणजे युध्दाजित पंडित हे असून याच नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याने बीड जिल्हाप्रमुख पदाच्या या युध्दात गेवराईचीच जीत होणार आसल्याची शक्यता नाकारता येत नाही.बीड जिल्हा शिवसेना प्रमुख पद स्थगिती देऊन बराच काळ लोटला आहे. नवा जिल्हाप्रमुख कोण याची उत्सुकता ताणलेली असून या शर्यतीत अनेक नावे पुढे येत असताना शिवसेनेने मात्र बीडच्या जिल्हाप्रमुख पदाबाबत सस्पेन्स कायम ठेवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here