



✒️बाळासाहेब ढोले(पुसद प्रतिनिधी)
पुसद(दि.7डिसेंबर):-भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,बोधिसत्व,परमपुज्य,विश्वभुषण,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संबोधी बुद्धविहार (लक्ष्मीनगर) श्रावस्तीनगर पुसद येथे अभिवादन करण्यात आले.प्रथमतः विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकरूनिक तथागत गौतम बुद्ध यांची पुज्यनिय भन्ते धम्मदीप यांच्याकडून दीप व धुप पुष्प अर्पून वंदन करण्यात आले.व बुद्ध वंदन घेऊन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.
मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.त्यानंतर सायंकाळी वेळ ठीक ६ वाजता संबोधी बुद्ध विहार यांच्यावतीने कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले.श्रावस्तीनगर येथुन कँडल मार्चला सुरवात झाली नंतर स्टेट बँक चौक,वसंतराव नाईक चौक, व नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुळ्याजवळ जवळ कँडल मार्चची सांगता करण्यात आली.यावेळी विविध नगर मधुन आलेल्या उपासक,उपासिका,बाल बालिका,व मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना सामुहिक त्रिवार वंदन करण्यात आले.





