Home महाराष्ट्र कोर्धा येथे रात्र कालीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

कोर्धा येथे रात्र कालीन कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन संपन्न

74

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

नागभिड(दि.7डिसेंबर):- जवळील कोर्धा येथे युवा फ्रेंड्स सांस्कृतिक व क्रीडा मंडळ यांच्या सौजन्याने एकलव्य कबड्डी मंडळ तर्फे रात्र कालीन कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन समारंभ नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून श्री. विकासजी जांभूळकर , निवृत्त सिव्हील इंजिनियर हे होते तर सहउद्घाटक म्हणून श्री. बापूराव खेवले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. संजय भाऊ गजपुरे जि. प. सदस्य चंद्रपूर हे होते व उपाध्यक्ष म्हणून श्री. दिनेश भाऊ चौधरी होते. त्याचबरोबर गावातील इतर मान्यवर मंडळींनी या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थिती दर्शविली.

कार्यक्रमाचे उद्घाटन फित कापून झाले. कार्यक्रमाप्रसंगी श्री. जांभूळकर साहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच मा.श्री. संजय भाऊ गजपूरे यांनी कबड्डी खेळाचे महत्त्व सांगून खिलाडीवृत्ती जोपासत ही स्पर्धा यशस्वी करण्याची विनंती केली व अशाचप्रकारे स्पर्धेचे आयोजन करावे असे सांगितले.कार्यक्रमाचे संचालन शंकर मशाखेत्री यांनी केले . या स्पर्धेत एकुण २० संघांनी सहभाग नोंदविला आहे . या मंडळाचे अध्यक्ष प्रदीप बोरकुटे, सचिव कुणाल निकुरे, पवण बोरकुटे व इतर सभासद या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी परिश्रम करीत आहेत .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here