



🔺सहाय्यक निबंधक याना दिले निवेदन राज्यातील सहकारी संस्थातील कामकाज होणार ठप्प
✒️नेरी प्रतिनिधी(नितीन पाटील)
नेरी(दि.7डिसेंबर):-राज्यातील गट सचिवांचे सेवा वेतनाचे प्रश्न सोडविण्यास शासन उदासीन असल्यामुळे गट सचिव व संस्था नियुक्त सचिव यांचा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांच्या निवडणूक कामकाज आणि शासकीय सर्व माहिती देण्यावर बहिष्कार टाकण्याचा आणि ८ डिसेंबर पासुन बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी गट सचिव व कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने घेतला आहे. त्यात चिमूर तालुक्यातील गटसचिव व संस्था नियुक्त सचिव सहभागी झाले आहेत. याबाबत नुकतेच गटसचिवांनी मा. सहाय्यक निबंधक तालुका चिमूर याना निवेदन दिले.
या निवेदनात राज्यातील गट सचिव व संस्था नियुक्त सचिवांच्या सेवा वेतनाच्या प्रश्नावर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य गट सचिव व कर्मचारी संघटनेने अनेक वेळा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री सहकार मंत्री प्रधान सचिव आणि सहकार आयुक्त आदीच्या भेटी घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. मोर्चे धरणे आंदोलने केली मात्र शासनाने दखल घेतली नाही.गट सचिवांच्या अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे गट सचिव आर्थिक संकटात व मानसिक तणावा खाली जगत आहे.
या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य गट सचिव व कर्मचारी संघटनेच्या संयुक्त कृती समितीने राज्यभरातील सोसायट्यांच्या निवडणूक कामकाजावर व सर्व शासकीय माहिती न देण्याबाबत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शासनाने वेधण्यासाठी धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. राज्य संघटनेचे या निर्णयाबाबत गटसचिव संघटना सक्रिय सहभागी होत असून गटसचिव पुढील निर्णय होईपर्यंत निवडणुकीचे कामकाज करणार नाही व शासकीय माहिती देणार नसल्याचा पवित्रा गटसचिव संघटनेने घेतलेला आहे.या प्रसंगी चिमूर चे सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक यांना निवेदन देण्यात आले यावेळी गटसचिव प्रदीप बंडे, विनोद बारसागडे, मंगेश मस्के, प्रशांत ठावरी, सुधाकर कुंदोजवार, पंकज रणदिवे, जयश्री सुकारे, मंगेश मुंगुणे, मत्ते, चौधरी, दीपक पचभाई, डेकाटे, झोडे, दिघोरे, प्रशांत पिसे आदी गटसचिव उपस्थित होते.


